ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

आज जे घडतंय ते पाहून आत्मा हादरला:ठाकरे गटातील संभाव्य फुटीवर अंजली दमानिया आक्रमक

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित फुटीच्या घडामोडींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण उद्धव ठाकरे गटाच्या समर्थक नसून लोकशाहीच्या बाजूने उभे असल्याचे स्पष्ट करत, सध्या सुरू असलेले राजकारण पाहून “आत्मा हादरला” असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये दमानिया यांनी खासदारांच्या संभाव्य पक्षांतरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदारांच्या जनादेशाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मी UBT समर्थक नाही, लोकशाही समर्थक- दमानिया अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी UBT गटाची अजिबात समर्थक नाही. मी लोकशाही समर्थक आहे. मी UBT गटाविरोधात टोकाचे लढे दिले आहेत. पण आज जे घडत आहे, ते पाहवत नाही.” त्यांनी संबंधित खासदारांच्या निवडणुकीतील विजयाची आठवण करून देत म्हटले की, या खासदारांनी शिंदे गटाच्या उमेदवारांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला होता. ‘मतदारांनी शिंदे गटाला नाकारले होते’ दमानिया यांनी उदाहरणे देत सांगितले की, संजय देशमुख यांनी शिंदे गटाचे हेमंत पाटील यांचा पराभव केला. भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना हरवले. नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटाचे उमेदवार भाऊराव कदम यांच्यावर विजय मिळवला. “याचा स्पष्ट अर्थ मतदारांनी त्यावेळी शिंदे गटाला नाकारले होते. मग आता निवडून आल्यानंतर त्याच गटात जाणे ही मतदारांची प्रतारणा नाही का? हा विश्वासघात नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मतदार खासदाराला नव्हे, विचारधारेलाही मतदान करतो दमानिया यांनी मतदारांच्या निर्णयामागील व्यापक संदर्भ मांडताना म्हटले की, मतदार केवळ व्यक्तीला मतदान करत नाही, तर तो एका पक्षाच्या चिन्हाला, विचारधारेला आणि उमेदवारावरील विश्वासालाही मतदान करतो. त्यांच्या मते, “मतदारांनी एका चिन्हाला, एका विचारधारेला आणि खासदारांवरील विश्वासाला मत दिले होते. आजच्या फोडाफोडीच्या राजकारणात केवळ खासदार विकले जात नाहीत, तर मतदारांचा विश्वास विकला जात आहे. ठाकरेंचे 6 खासदार फुटले, लोकसभा अध्यक्षांची स्वतंत्र गटाला मंजुरी! महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’ला अखेर यश आल्याचे चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी केलेल्या हालचालींना लोकसभा स्तरावर मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भातील अर्ज मंगळवारीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केला होता. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर