ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वैजापूर तहसील, बोकुड जळगाव, चितेगाव येथे स्वच्छता अभियान:जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


स्वच्छ, सुंदर आणि निरोगी समाज घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी (१३ जुन) जिल्ह्यात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. व मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांनी तर पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव, चितेगाव येथे ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून परिसर चकाचक केला. सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे आदेश अनेकदा केवळ कागदावरच राहतात, मात्र वैजापूर तहसील कार्यालयाने याला छेद दिला. शनिवारी पहाटे सात वाजताच तहसीलदार सुनील सावंत यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी झाडू, फावडे आणि टोपल्या घेऊन मैदानात उतरले. जुने डीएड महाविद्यालय येथे तात्पुरत्या स्वरूपात सुरू असलेल्या तहसील कार्यालयाचा परिसर अवघ्या दोन तासांच्या सामूहिक श्रमदानातून चकाचक करण्यात आला. आवारातील वाढलेले गवत, झुडपे, पालापाचोळा आणि प्लास्टिक कचरा हटवून प्रशासनाने नागरिकांसमोर स्वच्छतेचा नवा आदर्श ठेवला. या मोहिमेत तहसीलदार सुनील सावंत, नायब तहसीलदार सुरज कुमावत, प्रवीण काकडे, सहाय्यक महसूल अधिकारी दीपक त्रिभुवन, पारस पेटारे, नितीन यलगाटवार, महसूल सहाय्यक बिबिसार कावळे, महेश आणि सचिन गायकवाड यांच्यासह सर्व महसूल सेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. वैजापूर येथील स्वच्छता मोहीम केवळ कार्यालयाच्या आवारापुरती मर्यादित राहिली नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःचे दालन, फाईल टेबल, नोंदवही कक्ष आणि विविध विभागांचीही स्वच्छता यावेळी करण्यात आली. चितेगाव ग्रामपंचायत परिसरात जिल्हा परिषद सदस्य कुण्णा गिधाने, सरपंच नितीन गिधाने, प्रवीण शिंदे, किरण शेळके, अभिजित मगरे व वाहिदभाई यांच्या उपस्थितीत गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. बोकुड जळगावला ग्रामस्थांचा पुढाकार येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. यावेळी शाळा परिसर, सार्वजनिक ठिकाणे आणि आरोग्य उपकेंद्राची स्वच्छता करण्यात आली. चितेगाव येथे सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे, सरपंच भाऊसाहेब तरमळे, उपसरपंच हरिभाऊ आवारे, ग्रामविकास अधिकारी चौथे व मुख्याध्यापक नागमवार यांनी स्वतः झाडू हातात घेऊन श्रमदान केले. यावेळी शिक्षक लेडे, शिंदे, सोनार, राऊत यांच्यासह आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी विकास करपकांडे, प्रफुल्ल ताकवले, आरोग्य सेवक चंद्रकांत मगरे, वैभव कांबळे, शुभांगी जाधव व मोहिनी साठे, आशा सेविका अर्चना मनचरे, रंजना चव्हाण, पद्माबाई छडिदार, लक्ष्मण सोनवणे, ज्ञानेश्वर तरमळे आदींनी सहभाग घेतला. स्वच्छता ही आपली सामाजिक जबाबदारी Ãजिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. व मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर तहसील कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही केवळ एक सरकारी मोहीम नसून ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. जेव्हा अधिकारी स्वतः काम करतात, तेव्हा जनतेलाही त्याची प्रेरणा मिळते. – सुनील सावंत, तहसीलदार, वैजापूर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर