सगणापुर येथील घटणा.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत.ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही. काल दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोज शनिवारला दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास सगणापुर येथील शामराव भिमा ढोबरे वय सुमारे 70 वर्ष यांनी स्वतःचा घरातली सागाच्या फाट्याला दुपट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहिती नुसार शामराव भिमा ढोबरे वय सुमारे 70 वर्षे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वृद्धांचे नाव असून त्याचे किराणा दुकान होते. व त्याला स्वतःची शेती नव्हती ते ठेक्याने शेती करायचे आणि आपला कुटुंबाचा उद्धार निर्वाह करायचे या घटनेची माहिती सगणापुर येथील पोलिस पाटील यांनी मारेगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

व घटनेचा पंचनामा करून त्याला उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.त्यांचे मागे अपंग पत्नी,असाआप्त परिवार आहे.त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही.पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार भालचंद्र मांडवकर करीत आहेत.


