वाघाच्या हल्ल्यात गाय ठार.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील खैरगाव (भेदी) येथील ही घटना दिनांक 11ऑगस्ट 2022 रोजगुरुवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली आहे.शेतकऱ्यांची शेतकामाची जोमाने लगबग सुरू होताच पुन्हा परिसरात वाघाने एंट्री केल्याने शेतकरी शेतमजूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या खैरगाव,व बोटोनी, सराटी परिसरातील शेतशिवारात कपाशीचे निंदण व खुरणीचे कामे जोमाने सुरू आहे.

अनेकाने गावातली आपापले पशुधन गुराख्यांच्या राखणीत चराईसाठी घातले आहे त्यातच खैरगाव येथील शेतकरी सेवालाल रामसिंग चव्हाण यांच्या मालकीहक्काची गाय ही खैरगाव येथील देवरावजी मडावी यांचे जंगला जवळील पडीत शेतशिवारात चराईसाठी गेली होती. अशातच दबा धरुन बसलेल्या वाघाने गायीवर हल्ला चढवून जागीच ठार केल्याची घटना 11ऑगस्ट 2022 रोज गुरुवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास गुराख्याच्या निदर्शनास येताच घटना उघडकीस आली.
गुराख्याने या घटनेची माहिती पशुधन मालकास दिली पशुधन मालकाने त्वरीत वन विभागाला घटनेच्या संदर्भात माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवुन पंचनामा केला. शेतकरी पशुधन मालक सेवालाल रामसिंग चव्हाण यांच्या मालकीची गाय असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.गाईचा वाघाने पडशा पाडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी त्यांनी शेतकरी व पशुपालक सेवालाल रामसिंग चव्हाण यांनी केली आहे. परिसरात शेतीचे काम जोमाने सुरू आहे त्या मुळे वन विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा असे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.


