ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

मनपा क्षेत्रात 67 हजारांहून अधिक बालकांना पल्स पोलिओचे दोन थेंब:अमरावतीत मोहिमेची तयारी, आयुक्त वर्षा लड्डा यांचे आवाहन‎

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी आणि प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मोहिमेच्या नियोजनाचा सखोल आढावा घेण्यात आला असून शहरातील एकही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. मनपा क्षेत्रातील ६७ हजाराहून अधिक बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजले जाणार आहेत. या बैठकीस मनपा आयुक्त वर्षा लड्डा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, एन.एम.ए. अध्यक्ष डॉ. दिनेश वाघाडे, बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा काळे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विविध शहरी आरोग्य केंद्र उपस्थित होते. बैठकीत आगामी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लसीकरण केंद्रांची तयारी, बूथवरील मनुष्यबळ, मोबाईल व ट्रान्झिट पथकांची कार्यपद्धती, दुर्गम व स्थलांतरित कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन, जनजागृती उपक्रम तसेच लसीकरणानंतरच्या अहवाल व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. शहरातील प्रत्येक ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पोहोचावेत, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण ६७,१०७ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यावेळी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला २८ जून रोजी जवळच्या पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर घेऊन जावे आणि पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत. नियमित लसीकरण झाले असले तरी पल्स पोलिओचा डोस घेणे तितकेच आवश्यक आहे. शहरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.” वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लसीकरणासाठी आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, वाहतूक व्यवस्था आणि देखरेख यंत्रणा सज्ज असून, सर्व पथकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक भागातील बालकांची अचूक नोंद ठेवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. दिनेश वाघाडे आणि बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा काळे यांनीही पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब मिळतील यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.नोंद ठेवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. शहरात १९ मोबाईल, २९ ट्रान्झिट पथके तयार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शहरभर ३३७ लसीकरण बूथ, १९ मोबाईल पथके आणि २९ ट्रान्झिट पथके कार्यरत राहणार आहेत. बसस्थानके, रेल्वे स्थानक, प्रमुख चौक, स्थलांतरित वस्त्या आणि प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठिकाणी ट्रान्झिट पथकांद्वारे बालकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मोहिमेच्या तयारीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. आरोग्य विभाग, महानगरपालिका प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक आणि विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयातून ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर