ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत‎चोरीप्रकरणी तिघांना अटक:केबल, कॉपर तार चोरीच्या दोन घटनांत कारवाई‎‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | घोटी इगतपुरी तालुक्यातील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये घोटी पोलिसांनी तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २५ मे रोजी कंपनीतून ४२ हजार रुपये व २३ हजार रुपये किंमतीची अशी एकूण ६५ हजार रुपये किंमतीची केबल चोरीला गेली होती. याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकाने घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी सतिष विनोद सोनी व भुपेंद्र प्रमोद गिरी (दोघे रा. मध्यप्रदेश) यांना अटक केली आहे. दरम्यान, दुसऱ्या घटनेत २८ मे रोजी ट्रेलरचालक संशयित आरोपी भागू कीर उदयरामजी (रा. गोविंदपुरा, जिल्हा भिलवाड, राजस्थान) याने त्याच्या ताब्यातील ट्रेलरमधून (आरजे ०६ जीबी ७१६८) जिंदाल कंपनीत सामान शिफ्टिंग केले होते. त्यानंतर गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याचा बहाणा करून तो कंपनीबाहेर जात असताना कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी गाडीची कॅबिन तपासली. त्यावेळी कॅबिनमध्ये दीड लाख रुपये किंमतीची सुमारे १०० किलो कॉपरची तार लपवून चोरी केल्याचे उघड झाले. या दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतिक भिंगारदे, पोलीस हवालदार प्रकाश कासार, परिक्षित इंगळे, बाळासाहेब आहेर, दीपक सांगळे, संतोष नागरे, लक्ष्मण धकाते आणि प्रभु ठोंबरे यांच्या पथकाने केला. तपासानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कंपनी प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, चोरीस गेलेले साहित्य जप्त करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर