ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

महेश नवमीच्या शुभपर्वावर निघाली देखणी शोभायात्रा:वायएसपीचे सुनील राणा यांनी राजकमल चौकात केले स्वागत‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अमरावती महेश नवमीच्या पावन पर्वानिमित्त शहरात मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या देखण्या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, धार्मिक देखावे, आकर्षक रथ आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी शोभायात्रेची शोभा वाढवली. युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्या नेतृत्वात राजकमल चौकात जल्लोषात शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. महेश नवमी हा भगवान महेश अर्थात भगवान शिव यांना समर्पित असलेला महत्त्वाचा सण असून या निमित्ताने माहेश्वरी समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राजकमल चौक येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने शोभायात्रेतील भाविकांचे पुष्पवृष्टी करून तसेच हार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी आ.रवी राणा व नवनीत राणा यांच्या वतीने सुनील राणा यांनी माहेश्वरी समाजाला महेश नवमीच्या शुभेच्छा देत समाजाच्या एकता, संस्कृती आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. धार्मिक आणि सामाजिक परंपरा जपण्यासाठी अशा उत्सवांचे महत्त्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. या स्वागत कार्यक्रमाला महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, शिक्षण सभापती प्रिती रेवणे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी, समाजबांधव व मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शोभायात्रेत सहभागी होत समाजाच्या धार्मिक उत्साहाला प्रोत्साहन दिले. यावेळी राजकमल चौक परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. भक्तिमय वातावरण, जयघोष आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. महेश नवमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या स्वागत कार्यक्रमामुळे सामाजिक सलोखा, धार्मिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश समाजात पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सांगता माहेश्वरी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि समाजात सुख-समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करून करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रशांत वानखडे, नगरसेवक अजय जयस्वाल, नगरसेविका रजनी डोंगरे, नगरसवेक दिपक सम्राट ऊर्फ साहू, नगरसेवक महेश मुलचंदानी, नगरसेविका अर्चना पांडे, नगरसेवक आशिष अतकरे, माजी नगरसेवक प्रणित सोनी, सतिश मंत्री, कमल किशोर मालानी,भुषण पाटणे यांची उपस्थिती होती. प्रसादाचे केले वितरण राजकमल चौकात महेश नवमी शोभायात्रा पोहोचल्यानंतर सहभागी भाविकांना महापौर, उपमहापौर तसेच मनपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रसादाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी विविध संस्था, संघटनांनी शुद्ध पाणी, चहा, नाश्त्यासह गोड प्रसादाचे वितरण करण्यात आले. शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. तसेच या शोभायात्रेने शहरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर