ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

बदलापूरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तणाव:भाजप महिला नेत्याच्या मुलीवर गुन्हा, आईची पक्षातून हकालपट्टी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बदलापुरात भाजपच्या एका स्थानिक महिला नेत्याच्या मुलीने प्रभू श्रीरामांबाबत सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शनिवारी बदलापूर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजपने संबंधित महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला असून, पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बदलापूर पूर्व येथील भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रतिभा जाधव यांची कन्या मृणाल जाधव हिने इन्स्टाग्रामवर एक ‘रील’ शेअर केले होते. या व्हिडीओमध्ये तिने प्रभू श्रीरामांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचा वापर केला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच बदलापूरमधील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. शनिवारी सकाळपासूनच खरवई परिसरातील दुकाने आणि रिक्षा संघटनांनी कडकडीत बंद पाळून आपला निषेध नोंदवला. पक्षाने पदाचा घेतला राजीनामा या घटनेचे पडसाद उमटताच भारतीय जनता पक्षाने तातडीने पावले उचलली. मृणाल जाधवची आई प्रतिभा जाधव यांचा पक्षाने पदाचा राजीनामा घेतला असून त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. अशा कृत्याला माफी नाही, अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपला संताप व्यक्त केला. मृणालच्या आई-वडीलांनी व्यक्त केला खेद या प्रकरणावर मृणालचे वडील महेश जाधव आणि आई प्रतिभा जाधव यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आम्ही हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरे करतो, घरात नियमित पूजा-अर्चा असते, असे सांगत त्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र खेद व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी मृणाल जाधवला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. अशा कृत्याला माफी नाही- चित्रा वाघ भाजपच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्ष आहे तिच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत.प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर .. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही.भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर