ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

तीन वेळा महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीमध्ये हरलेला मंगळवेढ्याचा महेंद्र हिंदकेसरी:साताऱ्यातील हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत अखेर मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला विजेता‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सातारा येथे पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये हिंदी केसरीची गदा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावचा सुपुत्र ट्रिपल उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांनी उचलून तालुक्याचे नाव जगपातळीवर झळकावले आहे. सोलापूर जिल्ह्यातील व मंगळवेढा तालुक्यातील तो पहिला हिंदकेसरी ठरला आहे.तीन वेळा उप महाराष्ट्र केसरी ठरलेला महिंद्रा गायकवाड आणि महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात ही लढत पार पडली. कुस्तीमहर्षी पै.साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठान सातारा व तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने छत्रपती शाहू स्टेडियम येथे ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. यावेळी जागतिक कुस्ती संघटनेच्या अध्यक्षा, किर्गीस्तानच्या माजी उपपंतप्रधान सुलताना बेकोवा, पालकमंत्री शंभूराज देसाई, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे अध्यक्ष हिंदकेसरी संजयकुमार आदी मान्यवर पैलवान उपस्थित होते. आमदार समाधान आवताडे, धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील,भैरवनाथचे चेअरमन अनिल सावंत,विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी अभिनंदन केले. पृथ्वीराजवर मात करत पटकावली गदा अन् थार कार कुस्तीला सुरुवात झाल्यानंतर महेंद्रने आक्रमक पवित्रा घेतला होता. महेंद्र गायकवाडने एकेरी पट काढल्या नंतर दुसरा डाव टाकताना पृथ्वीराज मोहोळचा हाताला दुखापत झाली. पृथ्वीराज मोहोळने माघार घेतल्यानंतर कुस्ती थांबवण्यात आली. व महिंद्रा गायकवाड यांना हिंदकेसरी विजयी घोषित करण्यात आले. विजय घोषित करताच महेंद्रला अश्रू अनावर झाले. या ऐतिहासिक विजय पदासाठी त्यांनी मानाची हिंदकेसरी गदा, एक थार गाडी आपल्या नावावर केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर