ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

राज्याला स्थिरतेसाठी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात:शपथविधीसाठी किशोर जोरगेवार मुंबईकडे रवाना, चंद्रपुरात भाजप सत्ता स्थापनेचे प्रयत्न वेगात

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपच्या आमदारांनाही सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी भावना व्यक्त होत असून, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. पवार कुटुंबाचे आणि विशेषतः अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान निर्णायक राहिले असून, राज्याला स्थिर आणि सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात, असे मत भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच निर्णयासोबत भाजप ठामपणे उभा राहील, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका हीच भाजपमधील सर्वांची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या हालचाली सध्या सुरू असल्याचे वातावरण असून, त्याच पार्श्वभूमीवर आपण आज मुंबईला जात असल्याचे किशोर जोरगेवार यांनी सांगितले. सुनेत्रा पवार या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चा सुरू असून, त्यासाठीच मुंबईत उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदारांना अधिकृतपणे निमंत्रण दिले नसले तरी, अजित पवार आणि पवार कुटुंबाने आपल्याला राजकारणात नेहमीच साथ दिल्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य असल्याचे जोरगेवार यांनी नमूद केले. चंद्रपूरबद्दल फडणवीसांशी चर्चा करणार दरम्यान, चंद्रपूर शहराच्या राजकारणात सत्तास्थापनेच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. सोमवारी भाजपची अधिकृत गट नोंदणी होणार असून, त्यानंतर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या सध्याच्या राजकीय स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याचेही जोरगेवार यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद, गटबाजी, तसेच हिंसक प्रकार सुरू असल्याचा आरोप करत, सध्याची परिस्थिती शांत होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर भाजप चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी ठोस पावले उचलत आहे. उबाठा गटानेही भाजपसोबत जाण्यात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले असून, स्वतंत्र पक्ष असलेल्या उबाठाला सोबत घेऊन चंद्रपूरमध्ये भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर