झरी तालुक्यातील येडशी येथील भयावह वास्तव.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नाल्यावरच.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी :- मुकुटबन पासून येडशी सहा किलोमीटर दूर आहे येडशी येथील शालेय विद्यार्थी मुकुटबन येथे शिक्षणा साठी जातात.ऑटो च्या माध्यमातून जवळ्पास ७० ते ८० लहान विद्यार्थी मुकुटबन येथे जातात मात्र येडशी येथील नाला बंद असल्याने नाईलाजाने विध्यार्थ्यांनी नाल्यावरच झेंडा फडकवून व राष्ट्रगीत घेऊन नाल्यावरच या वर्षीच्या स्वतंत्र अमृत महोत्सव साजरा करण्याची वेळ आली.आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली मात्र विकासाच्या दृष्टिकोनातून येडशी हा गाव खूप मागे आहे.
कारणही तसेच आहे जेव्हा निवडणूका येतात तेव्हा फक्त गावात आश्वासन द्यायचे व वेळ आली की फिरून सुद्धा पहायचे नाही अस या क्षेत्रांत घडत आहे.तोंघराभर पाण्यात जाऊन जय हिंद व वंदे मातरम या नाऱ्याने नाल्यावरील परिसर दुमदुमला येडशी ला जायचे म्हटले की दोन ठिकाणी मोठं मोठाले खड्डे पडले आहे.मुलांना ऑटो मध्ये जायचे म्हटले तरी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.गावामध्ये बस ची सुविधा नाही. स्मशानभूमी नाही. बऱ्याच गावात समस्या आहे.तरी देखील प्रशासन सुस्त झोपेचे सोंग घेऊन असल्याचे गावकऱ्यांचे मनने आहे.
आता प्रशासन या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष देतील का असा देखील प्रश्न या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आमदार खासदार साहेबांनी जातीने लक्ष देऊन हा पूल नव्याने बनवण्यात यावा.कारण या पुला संदर्भात वेळोवेळी कागदोपत्री व्यवहार करून सुद्धा प्रशासनाने लक्ष दिले नाही.
आता तरी या अमृत महोत्सव च्या निमित्ताने लहान मुलांचा विचार करून पूल मोठा बांधण्यात यावा अशी मागणी होत आहे..


