▪️आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन.
▪️जोरदार पावसात काढलेल्या स्वातंत्र्याच्या रॅलीने, तसेच झाकीने वेधले मुकुटबन वासीयांचे लक्ष.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी: तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणारी गृहलक्ष्मी बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत सुरू असणाऱ्या गुरुकुल कॉन्व्हेंट, मुकुटबन येथेभरपावसात 75 वा स्वातंत्र्य दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा झाला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सतत पावसामुळे स्वातंत्र्य दिवसाच्या सोहळ्यावर विरजण पडेल असे वाटत असताना गुरुकुल शाळेत भरपावसात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाठमाटात आणि उत्साहात पार पडला.
शाळेचे आदरणीय संचालक तसेच मुकुटबन येथील पोलीस पाटील दीपक बरशेट्टीवार सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण होताच मोठ्या अभिमानाने भारताच्या राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले यानंतर पाहुण्यांच्या हस्ते भारतमाता, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. भारतीय स्वातंत्र्य दिवस सोहळ्याच्या विचारपीठावर शाळेच्या आदरणीय अध्यक्षा सौ सुरेखा संजय आगुलवार मॅडम, आदरणीय संचालिका सौ लक्ष्मी संजय हुडे मॅडम, सौ बरशेट्टीवार मॅडम, तसेच आदरणीय संचालक सुनील उत्तरवार सर, दीपक बरशेट्टीवार सर, शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक सुभाष गजभिये सर, कु प्रणय बरशेट्टीवार, तसेच आदरणीय पालक गोडे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक गजभिये सर यांनी स्वातंत्र्य सोहळ्याचे प्रस्ताविकपर यावेळी भाषण केले.शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी भाषणे सादर केली तसेच देशभक्तीपर गीत गायन केले.वर्ग 8 विचा विद्यार्थी अंशुल गोडे याने अद्भुत असा पोवाडा यावेळी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.शाळेतील कार्यक्रम झाल्यानंतर शाळेची स्वातंत्र्याची रॅली मुकुटबन कडे वळली.यामध्ये इयत्ता 8 ,9 व 10 वी च्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. योग्य शिस्तबद्ध पद्धतीने भरपावसात यावेळी मुकुटबन नगरीत शाळेच्या वतीने रॅली काढण्यात आली.
यावेळी तीन झाक्या काढण्यात आल्या.यामध्ये, विद्यार्थ्यांनी भारतमाता, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगेबाबा, सैनिक, शेतकरी इत्यादी भूमिका सादर केल्या.भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद अशा जोरदार घोषणेने संपूर्ण मुकुटबन नगरी दमळून निघाली. बसस्थानक चौकात शाळेच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य, पथनाट्य, पोवाडा सादर करून उपस्थित जनतेला मंत्रमुग्ध केले.
पाऊस सतत पडत असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या उत्साहात कसलाही फरक पडला नाही. मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांनी रॅली मध्ये तसेच विविध प्रकारच्या इव्हेन्टस मध्ये सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांनी कु अनुष्का वैद्य व कु समीक्षा ठावरी यांनी केले तर आभार प्रदर्शन इंग्रजी शिक्षक आशिष साबरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे व्यवस्थापन मंडळ ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.


