तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामनी :- शासकीय आश्रम शाळा जुनोनी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पार पडला.शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमधून ईश्वरचिट्ठीच्या माध्यमातून ध्वजारोहण करण्यात आला. ध्वजारोहणाचा मान माननीय पांडुरंग काकडे या पालकांना मिळाला. हा अभिनव उपक्रम राबवण्यामागे श्रेय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खंडाळकर यांना जाते.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारतभर साजरा होत असताना सर्वांच्या मनात आनंदाची लहर दिसून आली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खंडाळकर यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत शहीद झालेल्या महापुरुषांची माहिती कथन केली. त्याग समर्पण बलिदानाच्या हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे असे गौरव उद्गार खंडाळकर यांनी यावेळी काढले. याप्रसंगी शिक्षक वृंद हंसराज बोढे,गजानन पलकोंडावार, प्रणय सोमकुवर,काशीनाथ बहादे,सचिन वाळके राहुल पेंदोर ,श्रीकांत सुंकावार,कुमारी वर्मा, कुमारी वरखडे , दिपाली उईके, मणिषा गुरणुले, वाणिता यनगंटीवार, मारोती मेश्राम तसेच चतुर्थी श्रेणी कर्मचारी, व गावातील मंडळी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.