कॉग्रेसच्या कट्टर जेष्ठ कार्यकर्त्यांची मनसेत एंट्री.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
वणी विधानसभा क्षेत्रातील झरी तालुक्यातील गणेशपूर (कुकुटबोरी ) या गावातील असंख्य युवक, महिला यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्षा अल्का टेकाम, जिल्हा अध्यक्षा अर्चना बोदाडकर, झरी तालुका उपाध्यक्ष जिवन तोडासे, विनोद उलमाले, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे , युवा सरपंच शुभम भोयर ,वैशाली तायडे, ज्योती मेश्राम, राळेगाव तालुका अध्यक्ष शंकर वरघट, पुरुषोत्तम खंडाळकर, वणी शहर उपाध्यक्ष गितेश वैद्य, विलन बोदाडकर, नितीन कापसे, वैभव पुरानकर, रोशन शिंदे, यांच्यासह विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.