करणवाडी फाट्या जवळ भिषण अपघात.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर करणवाडी फाट्या जवळ आज दिनांक 30ऑगस्ट 2022 रोज मंगळवारला दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाले त्यांना काही नागरिकांनी तातळीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वणी यवतमाळ राज्य महामार्गावर करनवाडी फाट्यानजीक एक मोटारसायकल मारेगाव कडून पांडरकवड्या कडे जात होती तर दुसरी मोटारसायकल करणवाडी कडून मारेगाव कडे येत होती.दरम्यान या दोन मोटारसायकलमध्ये समोरासमोर जबर धडक झाली. एक व्यक्ती गंभीर जखमी झाले. तर दुसऱ्या दुचाीस्वार पसार झाला करणवाडी फाट्या जवळ हा अपघात झाला.

असुन.सुधाकर तुळशीराम अवताडे वय सुमारे [55] वर्षे रा. सुसरी ता.झरी जि. यवतमाळ असे अपघातात मृतकाचे नाव असून ते आज [ MH 29 AZ.8689] या होंडा फॅशन दुचाकीचे करणवाडी कडून मारेगाव कडे जात असल्याची माहिती प्राप्त झाली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना काही नागरिकांनी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळाच्या उपचारा नंतर येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तांच्या मागे पत्नी,तीन मुले असा आप्त परिवार आहे.या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.


