मारेगाव तालुक्यात आज आणखी एक आत्महत्या.

0
48

शिवणी (धोबे) येथील शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

शिवणी (धोबे) येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात आत्महत्या ह्या नित्याच्याच झाल्या सारख्या वाटत आहे. आज चौथ्या दिवशी एका शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असुन हरिदास सूर्यभान टोणपे, वय सुमारे [47] वर्षे रा. शिवणी (धोबे)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असुन

हरिदास सूर्यभान टोणपे या शेतकऱ्याच्या नावाने शिवणी (धोबे)येथे 5 एकर शेती आहे. सतत तीन वर्षे पडलेला दुष्काळ यामुळे हरिदास हे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेले होते. यावर्षी मोठया प्रमाणात पडलेला पाऊस. त्यामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानातून हरिदास यांना स्वतःला सावरता आले नाही. आपल्या डोळ्यासमोर अति पावसाने झालेले शेतीचे नुकसान पाहून हरिदासचे मन गहिवरून यायचे. अशाच विचारमग्न अवस्थेत असलेल्या शेतकऱ्याला अशा परिस्थितीत शेतीवरील कर्ज, तसेच खासगी कर्ज कसे फेडायचे या विचाराने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हरिदास यांनी आज दिनांक 30ऑगस्ट 2022 रोज मंगळवारला आपल्या घरची सर्व मंडळी शेतामध्ये गेले असता स्वतःच्या राहत्या घरी सकाळी 9 ते 10 च्या सुमारास मोनोसील हे कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. घरची मंडळी शेतामधून घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. परंतु कीटकनाशकाचे प्रमाण एवढे जास्त होते की घरची मंडळी येण्यापूर्वीच हरिदासचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली.

सतत आत्महत्यानी मारेगाव तालुका हादरून गेलेला आहे. आज सतत चौथी आत्महत्या ही समाजमनाला चटका लावून जाणारी आहे. सामाजिक व्यवस्थेला काळिमा फासणाऱ्या या घटणांमुळे मन सुन्न होऊन जात आहे. या घटणांना कुठेतरी आळा बसणे आवश्यक असतांना त्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने समाजव्यवस्थेला मोठा हादरा बसत आहे. हरिदासच्या पश्च्यात म्हातारी आई, पत्नी, मुलगी आणि मुलगा असा अप्तपरिवार आहे.

या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व पंचनामा करून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार सुरेंद्र टोंगे,विनेश राठोड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here