अन्यथा रास्ता रोको चा इशारा .
तालुका शिवसेनेचे तहसिलदार यांना निवेदन.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184
मारेगाव तालुक्यातील:- करणवाडी -कुंभा – बोरी (गदाजी), मारेगाव – मार्डी -हिवरा मार्गावर बऱ्याच ठीकाणी मोठमोठे खड्डे पडले असुन अपघातास निमंत्रण देत आहे.हा रस्ता अखेरची घटका मोजत आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्याच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की “रस्त्यात खड्डे की रस्ता खड्डयात,
दोन तालुक्याला जोडणाऱ्या तथा ग्रामीण भागातील मार्गाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ह्या मार्गाची दुरुस्ती करण्यासाठी आदेशीत करण्यात यावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल या अशा आशयाचे निवेदन तालुका शिवसेना प्रमुख संजय आवारी यांच्या नेतृत्वात तहसीलदार मारेगाव यांना दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोज शुक्रवारला देण्यात आला आहे.
मारेगांव व राळेगांव तालुक्याला जोडणारा हा मार्ग असुन, करणवाडी, कुंभा, महादापेठ,बोरी (गदाजी)व पुढे राळेगाव तालुक्यातील खैरी जाणाऱ्या ह्या मार्गावर बऱ्याच ठीकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.या मार्गावर आजपर्यंत किरकोळ व गंभिर स्वरुपाचे अनेक अपघात झाले असुन दुतर्फा झुडुपेही विस्तारली असल्याने रात्री तथा दिवसासुध्दा वाहण धारकासह पायदळ चालणे कठीण होत आहे.
मारेगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गदाजी बोरी सह त्या मार्गावरील शेतकरी शेतमजुर व विद्यार्थी कार्यालयीन कामाकरीता तालुकास्थळी येत असुन ह्या मार्गावर नेहमीच चार चाकी दुचाकी, व जड वाहणांचे आवागमन असते.मात्र या मार्गावर अनेक दिवसापासुन मोठमोठे खड्डे पडले असुन, जड वाहतुक सुध्दा पहावयास मिळत आहे. रस्त्याच्या मध्यभागी व रस्त्याच्या बाजुला मोठे खड्डे पडल्याने दुचाकी स्वारास रस्त्याच्या कडेला दुचाकी वाहन थांबवुन येणारे जड वाहन गेल्यानंतरच मार्ग मोकळा झाल्यावर कोणतेही वाहन किंवा दुचाकी जावु शकते.
या खड्ड्यांमुळे आजपर्यंत किरकोळ व गंभीर स्वरुपाचे अपघात झाले आहेत.अनेक दिवसांपासून सदर मार्ग खड्ड्यानी व्यापलेला असुन वाहन चालवताना जीव मुठीत घेवुन खड्डे चुकवत अक्षरशः सर्कस करावी लागत आहे. यासह मारेगाव – मार्डी – हिवरा हा मार्ग सुध्दा जिवघेणा ठरत असुन दररोजच अपघात होत असतांना डोळेझाक करत असल्याने हे मार्ग येत्या आठ दिवसांत दुरुस्त करण्यात येण्यासाठी आदेशीत करण्यात यावे अन्यथा रस्ता रोको करणार असल्याचा इशारा तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार मारेगाव यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी तालुका प्रमुख संजय आवारी, नगराध्यक्ष डाॅ. मनिष मस्की ता. युवा सेना प्रमुख मयुर ठाकरे, सुनिल गेडाम, गजानन ठाकरे, निलेश ताजणे यांचेसह पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.