16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार.

0
56

बाल लैंगिक अत्याचार पोक्सो अंतर्गत आरोपीला अटक.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन 15 दिवस तिचेवर जबरीने अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचेवर बाल लैंगिक अत्याचार पोक्सो सह विविध कलमांअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की,
मारेगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडिलां सोबत राहत होती. तीला दिनांक 16 ऑगस्टला एका अज्ञात व्यक्तीने 16 ऑगस्टच्या मध्यरात्री पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिनांक 17 ऑगस्टला मारेगाव पोलीस ठाण्यात केली होती. काही दिवस निघून गेले. पोलीस या अज्ञात आरोपीच्या शोधात होते.

अखेर त्यांनी या दोघांना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवळा येथून अटक करून आणले.या प्रकरणी मुलीनेही आपल्या जबाबामध्ये संशयित आरोपी अजय गणेश मेश्राम वय 20 वर्षे हा मारेगाव तालुक्यातील तिच्या गावाशेजारी असलेल्या चिंचमंडळ येथील राहिवासी आहे. त्याने या अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी केली. त्यावेळी या मुलीने नकार दिला.

तू माझेशी लग्न केले नाही आणि जर तू माझेसोबत आली नाही तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेल अशी धमकीही दिली. मुलगी घाबरली. या वरून आरोपी अजय याने या बालिकेला दिनांक 16 ऑगस्टला रात्री 10.30 चे नंतर जबरीने पळवून नेले. आणि वारंवार या बालिकेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

यावरून मारेगाव पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून कलम 366 (अ),376,376 (1) (ए ),376 (2) ( जे )( एन )506 सहकलम 4,6 पोक्सो (बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी )अटक करून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here