शिक्षक समन्वय समिती झरी (जामणी ) वतीने शिक्षक दिन.

0
112

झरी तालुक्यातील दहा शिक्षक ‘शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित.

चार सेवानिवृत्त शिक्षकांचा केला सत्कार.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- आज ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती झरी जामणी येथे सर्व संघटनाच्या वतीने शिक्षक समन्वय समिती झरी जामणी द्वारा शाळा स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना तालुकास्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार देऊन व ज्यांनी आयुष्याची सर्व सेवा काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवून हजारोंच्या आयुष्यात रंग भरले अशा चार सेवानिवृत्ती शिक्षकांचा सत्कार सोहळा पंचायत समिती सभागृह झरी (जामनी)येथे दिनांक ५ / ९ / २०२२ रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रविकुमार सांगळे गटविकास अधिकारी प.स.झरी,प्रमुख अतिथी म्हणून मा.प्रकाश नगराळे साहेब गटशिक्षणाधिकारी प.स.झरी, विशेष उपस्थिती मोहन गेडाम तालुका वैद्यकीय अधिकारी झरी,नगराळे साहेब लेखाधिकारी झरी,संतोष मेश्राम अध्यक्ष तालुका कृती समिती झरी हे होते.
या सोहळ्यात झरी पं.स.अंतर्गत येणाऱ्या शाळेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दहा शिक्षकांना”शिक्षक रत्न”पुरस्काराने सन्मानित केले व चार सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.


यामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक डी.बी.श्रीरामोजवार शाळा सुरदापुर ,कु.रुख्मिनी पुप्पलवार शाळा गवारा,कु.सविता सैपटवार शाळा कटलीबोरगाव मधुकरराव गोडे शाळा येवती, पारस पाटील शाळा वेडद,श्री शंकर दोडके शाळा माथार्जून, तुलसीदास आवारी शाळा कोसारा,सुरेश पेंढरवार शाळा सुर्ला, संतोष बर्लावार शाळा मार्की खु.वामन वाघाडे शाळा मांगली या शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार देण्यात आला. तसेच सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये डी आर कसरेवार शाळा दिग्रस, बी.जी. ठाकरे शाळा दाभा,सुधाकर नरांजे यांचा सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन काटकर,सूत्र संचालन शंकर केमेकार,आभार प्रदर्शन जगदीश आरमुरवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन काटकर,धीरज यादव,शंकर केमेकार,विठ्ठल केमेकार ,जगदीश आरमुवार,विजय लक्षेट्टीवार,गणेश बुट्टे,विश्वनाथ कामनवार, आनंदकुमार शेंडे ,संतोष मेश्राम, राजेश अक्केवार,राहुल धोटे,विनोद बोरकर आणि सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here