चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
मो. [9922862184]
मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (ल)येथील सुमारे 28 वर्षीय शेतकरी पुत्रानी कीटकनाशक प्राशन केल्याची घटना दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोज रविवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत. ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही.
पांढरकवडा (ल)येथील सुधीर रवींद्र गोलर वय सुमारे 28 वर्ष असे आत्महत्या केलेल्या अविवाहीत शेतकरी पुत्राचे नाव असून मिळालेल्या माहिती नुसार सुधीर यांने दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोज रविवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास स्वतःच्या शेतात विषारी मोनोशिल नावाचे किटकनाशक प्राशन केल्याची माहिती त्यांच्या कुटबियांना मिळताच कुटुंबियांनी तातडीने उपचारांसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र त्यांची प्रकूर्ती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान आज दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोज मंगळवारला दुपारच्या सुमारास चंद्रपूर येथे सुधीरची प्राणज्योत मालवल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याची मौजा.पांढरकवडा (ल) येथे सामायिक शेती आहे. तो शेती करून आपली आई व लहान भाऊ यांच्यासोबत राहत होता.
सुधीर हा अविवाहित होता. तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. सतत होत असलेली नापिकी आणि यावर्षीचा दुष्काळ यामुळे आर्थिकदृष्ट्या तो खचलेला होता. अशातच सुधीरने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे अशी चर्चा आहे. त्याच्यामागे वृद्ध आई, व एक लहान भाऊ असा आप्त परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.
सततच्या आत्महत्या तालुक्याला चटका लावून जात आहेत एवढे मात्र नक्की.