ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

पोलीस बांधवांना राखी बांधून महिला सुरक्षेचा दिला संदेश

638 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शिवसेना महिला आघाडी व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनचा वणी पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सोहळा

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क, वणी

वणी: रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण नसून, महिला सुरक्षेची जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा उत्सव आहे, असा संदेश शिवसेना महिला आघाडी व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने वणी पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्यातून देण्यात आला. महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून महिला व भगिनींच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले.

शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वणी पोलीस ठाण्यात हा आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला. उपस्थित महिला भगिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या सेवाभावी कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील महिला व युवतींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अधिक संवेदनशीलतेने व तत्परतेने कार्य करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाला किरणताई देरकर अध्यक्ष सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी ,शिवसेना ज्येष्ठ नेत्या व माजी जिल्हाप्रमुख सौ.  ज्येष्ठ नेत्या व सरपंच सौ. गीताताई उपरे, महिला तालुकाप्रमुख सौ. सुरेखाताई ढेंगळे, महिला तालुका सचिव सौ. पौर्णिमाताई राजुरकर, महिला शहरप्रमुख सौ. सविताताई गुलाबराव आवारी,

माजी पंचायत समिती सदस्य सौ. चंदाताई मुन, नगरसेविका सौ. कांचनताई देरकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशालीताई देठे तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेणूताई झोडे, सौ. मंजूताई इनामे व वर्षाताई पोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलीस आणि समाज यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याबरोबरच महिला सुरक्षेचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा निर्धार यावेळी महिला भगिनींनी व्यक्त केला. राखीच्या पवित्र धाग्याने पोलीस बांधव आणि महिला शक्ती यांच्यातील संरक्षण, विश्वास व सन्मानाचे नाते आणखी दृढ झाल्याचे चित्र वणी पोलीस ठाण्यात पाहायला मिळाले

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर