ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

3.8k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणी – वरोरा महामार्गावरील घटना

दुचाकीस्वार तरुण मारेगाव येथील

तालुका प्रतिनिधी वणी

चंद्रपूर येथून बहिणीच्या गावावरून मारेगाव येथे दुचाकीने परत येत असतांना  युवकाच्या दुचाकीला संविधान चौक येथे मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात या युवकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना दि. 5 फेब्रुवारीला सकाळी 10.30 च्या दरम्यान वणी – वरोरा रोडवरील संविधान चौक घडली. अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव गणेश हरिचंद्र बदकी वय अंदाजे 26 वर्ष रा.मारेगाव असे आहे.

गणेश हा चंद्रपूर येथे बहिणीची तब्येत बरी नसल्याने भेटायला गेला होता. बुधवारी दि. 5 तारखेला तो वरोरा मार्गे परत येत असतांना वणी वरोरा महामार्गावरील संविधान चौकात मालवाहू ट्रक क्र. CG 04 PH 0520 ने गणेशच्या दुचाकी क्र.MH 29 AB 1563 ला जोरदार धडक दिली.

ही धडक एवढी जोरदार होती की यात गणेशचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्यानंतर वाहन चालक हा वाहनासह पोलिस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला. दुचाकी चालक गणेश बदकी हा मारेगाव येथील रहिवाशी होता.अपघाताची माहिती वणी पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.सदर घटनेचा प्राथमिक तपास जमादार संतोष आढाव करीत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील व एक विवाहित बहीण आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर