ब्रेकिंग न्यूज
⚡ Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख… ✦ ⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट
SP News Maregaon

मराठमोळ्या सचिनच्या घरी ओणमचं सेलिब्रेशन, अख्खं तेंडुलकर कुटुंब जमलं, पण एका गेस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं!

15 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई : जागतिक क्रिकेटमधला महान खेळाडू सचिन तेंडुलकरने कुटुंब आणि मित्रांसोबत ओणमच्या सणाचं जल्लोषात सेलिब्रेशन केलं. सचिनने त्याच्या सोशल मीडियावरून याचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सचिनचं कुटुंब आणि त्याचे मित्र डायनिंग टेबलवर बसून जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. पण या फोटोमध्ये एक पाहुणा असाही आहे, ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

फोटोमध्ये सचिन तेंडुलकर कुटुंब आणि मित्रांसोबत डायनिंग टेबलवर बसून हसताना दिसत आहे. तसंच टेबल वेगेवेगळ्या पक्वानांनी सजलं आहे, त्यामुळे घरातील वातावरणही आनंदी आणि प्रसन्न आहे. ओणमच्या निमित्ताने सचिन त्याचे मित्र आणि कुटुंबासोबत खास क्षण एन्जॉय करताना दिसत आहे.

सचिनने हा फोटो शेअर करतानाच चाहत्यांना एक हिंट दिली. तुम्हाला कुणाला बाऊन्सर सापडतोय का? ज्याला बाऊन्सर सापडेल त्याला एक्स्ट्रा मिठाई देण्यात येईल, असं कॅप्शन सचिनने त्याच्या या पोस्टला दिलं आहे. सचिनने दिलेल्या या चॅलेंजनंतर त्याच्या चाहत्यांनीही फोटो निरखून पाहायला सुरूवात केली आणि कमेंटमध्ये याचं उत्तर दिलं.

या फोटोची खरी कहाणी टेबलच्या खाली लपली होती. सचिनचा पाळीव श्वान बाऊन्सरदेखील कुटुंबाच्या सेलिब्रेशनचा भाग होता, पम तो कॅमेरासमोर यायच्यऐवजी टेबलच्या खाली लपून बसला होता. सचिनने चाहत्यांना फोटोमध्ये बाऊन्सरला शोधण्याचं चॅलेंज दिलं.

Was too busy enjoying the food, the family, and the fur to post about it! Happy Onam to those who celebrated.

PS: Extra piece of dessert for whoever can spot Bouncer pic.twitter.com/OVPO5zJXaz
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 27, 2026

‘मी कुटुंब, जेवण आणि माझ्या फरवाल्या सहकाऱ्यासोबत सेलिब्रेशन करण्यात इतका बिझी होतो, त्यामुळे आधी पोस्ट करू शकलो नाही. फोटोमध्ये बाऊन्सरला शोधू शकाल का? ज्याला सापडेल त्याला मिठाईचा जास्तचा तुकडा मिळेल’, असं सचिन त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला. सचिनच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

घरातील पाळीव श्वान कायम कुटुंबासोबतच असतं, अशी कमेंट काहींनी केली आहे. तर फॅमिली, फिस्ट आणि फोर लेग गेस्ट, अशी कमेंट युजरने केली आहे. तर काहींनी सचिन त्याच्या कुटुंबासोबत जेवत असतानाही बाऊन्सरला सोबत ठेवतो, याचंही कौतुक केलं आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर