ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

उभ्या ट्रकला दुचाकीची भीषण धडक एक युवक ठार तर एक गंभीर जखमी.

120 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नवरगाव (कायर)फाट्याजवळील घटना.

तालुका प्रतिनिधी:- वणी

वणी – कायर मार्गावर नवरगाव फाट्या जवळ काल दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोज सोमवारला रात्री 8:30 वाजताच्या सुमारास दुचाकीची उभ्या ट्रकला भीषण धडक या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

अजय बंडू खैरे वय सुमारे 23 वर्षे असे दुर्दैवी मृतकाचे नाव आहे.तसेच विजय विठ्ठल टिकले वय सुमारे 22 वर्ष हा तरुण गंभीर जखमी असून ते दोघेही पळसोनी येथील निवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

काल कायर मार्गावर नवरगाव एरियात ट्रक उभा होता.कायर वरून दुचाकी क्रमांक MH-34-G-4049 या हिरो होंडा कंपनीच्या दुचाकीने हे दोघे तरुण आपल्या गावाला पळसोनी येथे परतजात होते.त्यांना रस्त्यावरील उभा केलेला ट्रक त्यांच्या निदर्शनास आला नाही आणि ते ट्रकवर आदळले.या भीषण अपघात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरे गंभीर जखमी झाले आहे.

पळसोनी येथिल अजय खैरे व विजय टिकले हे दोघेही तरुण काल सायंकाळी कायर येथे मिस्त्री पाहण्यासाठी गेले होते.अपघात होताच त्यांना रस्त्यांनी ये -जा करणाऱ्यांनी लगेच वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण येथील डॉक्टरांनी अजय याला मृत घोषित केले तर विजय याची प्रकुर्ती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

घटना घडताच परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.या घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.व पुढील तपास करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर