ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

अल्पवयीन पोरं, शिकवतो म्हणून मुंबईला आणलं अन् नरकात ढकललं, पैशांसाठी बाप आणि आत्याचं भयानक कृत्य

7 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नवी मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षणाचे स्वप्न दाखवून नवी मुंबईत आणलेल्या अल्पवयीन मुलीला जेऊरच्या बारमध्ये काम करण्यास भाग पाडले. तसेच तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आत्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

शिक्षणाचे स्वप्न दाखवून अल्पवयीन मुलीला सख्ख्या आत्यानेच नवी मुंबईत आणले होते. यानंतर तिला जेऊरच्या बारमध्ये काम करण्यासाठी भाग पाडले. जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत रेझिडेन्सी बारमध्ये मिळालेले काही पैसे आत्याने हडप केले, तसेच काही रक्कम पीडितेच्या वडिलांना पाठवली. यावेळी पीडितेने बारमध्ये काम करण्यास वारंवार नकार दिला. परंतु आत्याने तिला बेदम मारहाण केली आणि हात-पाय बांधून डांबून ठेवले. या छळाला कंटाळून पीडितेने एका मित्राच्या मदतीने नवी मुंबईहून पळ काढून आपले मूळ गाव गाठले, परंतु तिथे तिच्या जन्मदात्या पित्याने देखील स्वतःच्या मुलीच्या विक्रीचा प्रयत्न केला.

पित्याच्या या क्रूर कृत्यामुळे भयभीत झालेल्या मुलीने पुन्हा आपल्या मित्राच्या मदतीने गाव सोडून मुंबई गाठली. यानंतर पीडितेच्या मित्राने एका वकिलामार्फत तिला बालकल्याण समितीसमोर हजर केले. बालकल्याण समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडितेला संरक्षण दिले आणि पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले.

यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून सुरुवातीला उलवे पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल केला होता. परंतु घटनास्थळ खैराणे एमआयडीसी परिसर असल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी तुर्भे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार तुर्भे पोलिसांनी पीडितेचे वडील अमर जगदीश सिंग, आत्या राणी सिंग, बबलू सिंग आणि सुमन सिंग यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर