प्रशासनाचे दुर्लक्ष कारवाई करण्याची मागणी.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी शासकीय कामारिता व वैयक्तिक लाभाकरिता संगणीकृत सातबारा,गावनुमना आठ अ,उत्पनाचा दाखला , जातीचे दाखले,नॉन क्रिमिलिअर सर्वप्रकारचे प्रतिज्ञापत्र , हैसियत दाखला,रेशन कार्ड,स्थानिक रहिवासी दाखला या विविध प्रकारच्या दाखल्याची गरज जनतेला पडते,हे सर्व दाखले सेतू सुविधा केंद्र मिळत असते या साठी शासनाने दर निश्चित केले आहे परंतु झरी तालुक्यात मात्र अव्वाच्या सव्वा दर आकारुन सर्वसामान्य जनतेला लूटत करत असल्याची तक्रार तहशीलदार गिरिश जोशी यांचे कडे करण्यात आली आहे.
येदलापूर येथिल रहिवासी दयाकर गेडाम यांनी दोन दिवसांपूर्वी उत्पन्नच्या दाखल्या साठी तहसील कार्यालयात असणाऱ्या सेतू सुविधा केंद्रात अर्ज केला.त्यानी त्या दाखल्याच्या दोन प्रति मागितल्या असता दोन प्रतिचे ६७.२० रुपये घेण्यायेवजी २०० रु घेतले.सदर रकमेची पावती दिली नसल्याची तक्रार २० सप्टेंबर रोजी तहशीलदार यांचे कडे केली आहे.
सेतू सुविधा केंद्र कडून तालुक्यातील गरिब आदिवासी जनतेची लूट सुरू असतांना प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्या चा आरोप केला आहे.सदर सेतू सुविधाकेंद्र ची चौकसी करून परवाना रद्द करण्यात यावा.तालुक्यात या केंद्राकडून होणारी लूट थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गेडाम यांनी दिला आहे .