ओव्हरलोड वाहतुकीने चिलई ते गणेशपूर रस्त्याची दुरवस्था.

0
49

सिंमेट कॉक्रीट रोडच्या मागणी साठी रेल्वे पुलावजवळ रास्ता रोको.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- मागील वर्षापर्यंत चिलई ते गणेशपूर रस्ता अतिशय चांगल्या अवस्थेत होता परंतु या काळात येथे विविध कंपन्याच्या निर्माण कार्यामुळे या कंपनी मध्ये ३० ते ४० टन क्षमता असणान्या ट्रकची वाहतूक अवैधरित्या चालू झाली परंतु रस्त्यांची क्षमता १५ टन इतकी आहे.

त्यामुळे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना येथूनच जवळ असलेल्या मुकुटबन हे बाजारपेठ, बँकचे कामे तसेच शिक्षणासाठी मुलाना जावे लागते.त्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मुलांना नेण्याकरिता येणाऱ्या बसेस बंद होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे .

त्यामुळे विद्यार्थ्यांन चे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, काही पालक हे आपल्या पाल्यांना दुचाकीने मुकुटबन येथे सोडण्याकरिता जातात रस्ता चिखलमय झाल्यामुळे चालणाऱ्या ट्रक धूळ उडवत नेतात त्यामुळे समोरचं काहीही दिसत नाही.धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे जास इजा निर्माण होऊ लागल्या आहे. तसेच दिवसाआड शहरात कामाकरिता जाणाऱ्या नागरिकांचे अपघात होत आहे.

त्यामुळे रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रटीकरण करणे गरजेचे असून सदर रस्त्याची आपण त्वरित पाहणी करून लवकरात लवकर रस्ता तयार करण्यात यावा दिनांक २० सप्टेंबर रोज मंगळवार चिलई (आमालोन ) ग्राम पंचायत कडून कंपन्याच्या अवैध वाहतुकीविरुद्ध चक्का जाम आंदोलन करण्यात आले . परंतु या परिसरातील सहा खाजगी कंपन्यानी हमी पत्र लिहून दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here