सप्तखणजेरी वादक संदीपपाल महाराज व युवा प्रबोधनकर रवी मानव यांच्याही विचारांचे पुष्प.
तालुका प्रतिनीधी :- वणी
वणी :- तालुक्यातील सुंदर नगर येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने गुरुकुंज मोझरी येथील बाल कीर्तनकार प्रज्वल टोंगे यांच्या जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन उध्या दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोज गुरुवारला रात्री 8 वाजता कार्यक्रम करण्यात येणार असून यावेळी सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य संदीपपाल महाराज व युवा समाज प्रबोधनकार रवीदादा मानव यांच्या सामाजिक प्रबोधन विचारांचे ही पुष्प गुंफल्या जाणार आहे.

नवरात्रौ उत्सवाची सुरवात सर्वत्र झाली असून या नवरात्रौ उत्सवनिमित्य सुंदर नगर सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातच सुप्रसिद्ध बाल कीर्तनकार प्रज्वल टोंगे तर संदीपपाल महाराज व रवी मानव यांचे प्रबोधन सर्वांसाठी नवं चेतना निर्माण करणार आहे. या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी केल्या जात असून सर्वांना या कार्यक्रमाची आतुरता लागली आहे. तरी सर्व जनतेनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणाचे आवाहन मोहन वैध यांनी केले आहे.



