तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी तालुका झरी जामणीच्या वतीने मुकुटबन येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन रविवार दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी राजराजेश्वर मंदीर सभागृह, मुकुटबन येथे करण्यात आले. या शिबिराला वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय श्री संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब यांचे वाढदिवसाच्या निमित्य रक्तदान शिबीर आणि ग्रामपंचायत मध्ये निवडूण आलेले नवनिर्वाचीत सर्व सरपंच व सदस्य यांचा सत्कार आमदार साहेबांच्या हस्ते करण्यात आला.
ह्या कार्यक्रमाला उपस्थित सतीश नाकले भाजपा तालुकाध्यक्ष, राजेश्वर गोंड्रावार मा.सभापती पं.स. झरी, मा.उपसभापती सौ.लताताई आत्राम, जिल्हा सचिव नितीन वासेकर मुकुटबन ग्रा.पं.चे सरपंचा सौ.मीनाताई आरमुरवार, उपसरपंच अनिल कुंटावार व सर्व सदस्यगण मुकुटबन, माजी जि.प. सदस्य तसेच झरी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व सदस्य, कार्यकर्ते ह्या शिबिरात 92 रक्तदात्यानीं रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व बक्षिसे देण्यात आले.
यावेळी झरीजामणी तालुक्यातील सर्व आजी व माजी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


