ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, …

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड: गेल्या काही काळात बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या संबंधित अत्याचाराच्या संतापजनक घटना पुढे आल्या आहेत. आता गेवराई तालुक्यात शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा शिक्षकानेच लैंगिक छळ केला. याप्रकरणी अविनाश ढेरे याला गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोक्सो कायद्यासह विविध कलमांनुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अविनाश ढेरे (रा. जिजाऊ नगर, कॅनल रोड, बीड) हा गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. चौथीच्या वर्गातील मुलींना तो मधल्या सुट्टीत तसेच शाळा सुटल्यानंतर वर्गात थांबवून घेत होता. तसेच कपडे काढून डान्स करीत ‘बॅड टच’ करीत त्यांचा छळ करत होता. हा प्रकार 12 ते 14 ऑक्टोबरच्या दरम्यान घडला.

बीड हादरलं! परळीत तरुणाकडून जीवन संपवण्याचा प्रयत्न, थेट उड्डाण पुलावरून मारली उडी

एक दिवशी चौथीत शिकणारी पीडित मुलगी सायंकाळी पाचच्या सुमारास घरी आली. ती अत्यंत घाबरलेली होती. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ती रडताना पाहून तिच्या आईनं तिची विचारपूस केली. तर तिनं आपबिती सांगितली. त्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी शिक्षकाच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान, या प्रकरणात अविनाश ढेरे याच्याविरोधात गेवराई पोलिसांत पोक्सोसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे. मात्र, शिक्षकाच्या या कृत्यानं संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर