ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

अनुसूचित जातीच्या 59 जातींचा जनसागर रस्त्यावर उतरणार:उपवर्गीकरणाचा घाट हाणून पाडण्यासाठी तिवस्यात ‘एल्गार मोर्चा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशात हिंदू-मुस्लिम वाद पेटवल्यानंतर आता केंद्र व राज्य सरकारने जाती-जातीत भांडणे लावण्याचे राजकारण सुरू केले आहेत. अनुसूचित जातीतील ५९ जातींचे हक्काचे १३ टक्के आरक्षण संपवण्याचा सरकारचा हा कुटील डाव असून, हा उपवर्गीकरणाचा घाट कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडला जाईल, असा इशारा तिवसा येथील उपवर्गीकरण कृती समितीने दिला आहे. या धोरणाविरोधात येत्या ३० जून रोजी दुपारी १२ वाजता तिवसा येथे ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोर्चात ५ हजारपेक्षा जास्त आंबेडकरी जनसागर रस्त्यावर उतरणार असून, तालुक्यातील सामाजिक व राजकीय वातावरण या निमित्ताने कमालीचे तापले आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या सरकारच्या धोरणाविरोधात तिवसा तालुक्यातील समाज बांधव अत्यंत आक्रमक झाले आहेत. ५९ जातींना एकसंघ ठेवण्याच्या उद्देशाने काढण्यात येणारा हा मोर्चा केवळ आंदोलन नसून, येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी आणि सरकारच्या जातीवादी धोरणांचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेली लढाई असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यातील प्रत्येक गावात आणि बौद्ध विहारांमध्ये युद्धपातळीवर जनजागृती केली जात आहे. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या ऐतिहासिक एल्गार मोर्चाची सुरुवात होईल. या मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे भीम सैनिक महापुरुषांची वेशभूषा करून यामध्ये सामील होणार आहेत. विशेष म्हणजे, सर्वपक्षीय राजकीय नेते, विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते पक्षभेद विसरून या आंदोलनात एकवटणार आहेत. पत्रकार परिषदेला अनिल थूल, प्रशांत कांबळे, संदीप चक्रनारायण, सागर भवते, जानराव मनोहर, राजेंद्र शेंडे, भारत दाहाट, दिलीप जवंजाळ, संदीप दाहाट, प्रशिक शापामोहन आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आरक्षणाचे उपवर्गीकरण नुकसानदायक महाराष्ट्रातील ५९ जाती आजवर गुण्यागोविंदाने एकत्र राहत आल्या आहेत. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या या जातींमध्ये आरक्षणाच्या नावाखाली भांडणे लावून १३ टक्के आरक्षण मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर आरक्षणाचे उपवर्गीकरण झाले, तर ५९ जातींमधील एकाही घटकाचे शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक उत्थान होणार नाही, ते पूर्णपणे रखडेल. म्हणूनच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तालुक्यातील ५९ जातींनी मोठ्या संख्येने या एल्गार मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर