ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

बोरगाव मंजू परिसरात खरिपाच्या पेरण्या रखडल्या:शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बोरगाव मंजू व परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत आटोपून ठेवली आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. चालू हंगामातील मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने परिसरातील १०० टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या असून शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गत दोन दशकांपासून निसर्गाचा समतोल ढासळल्याने पावसाचे चक्र बदलले असून, दरवर्षी पावसाला विलंब होत आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट होत असून शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटत चालली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी विविध मार्गांनी पैशांची जुळवाजुळव केली. महागडे बियाणे, खते आणि कीटकनाशकांची खरेदी करून शेतकरी सज्ज झाले आहेत, परंतु जून महिना अर्धा अधिक संपत आला तरी दमदार पाऊस न झाल्याने चिंता वाढली आहे. परिसरातील शेतजमीन प्रामुख्याने काळी आणि बरड अशा दोन भागांत विभागलेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर किंवा कूपनलिकेची सोय आहे, त्यांनी अल्प प्रमाणात कपाशीची कोरडी लागवड केली आहे. मात्र, सध्या भूजल पातळी कमालीची खालावली असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर आणखी काही दिवस पाऊस लांबला, तर या बागायतदार शेतकऱ्यांनाही मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांनी केवळ पहिल्याच ओल्या पावसावर पेरणीची घाई करू नये. पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय बियाणे टोबू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास बियाणे वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. दरवर्षी उशिरा येणाऱ्या पावसामुळे या पिकांचे हातचे उत्पादन जाते, असा अनुभव आहे. यावर्षीही पाऊस लांबल्याने मूग व उडदाचा पेरा लक्षणीयरीत्या कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. मूग, उडीद पिकांना फटका बोरगाव मंजू परिसरात सोयाबीन आणि कपाशी या पिकांचा पेरा सर्वाधिक असतो. याशिवाय तूर, मूग, उडीद, ज्वारी आणि भाजीपाल्याचे उत्पादनही घेतले जाते. मात्र, पाऊस लांबल्याचा थेट फटका मूग आणि उडीद या नगदी पिकांच्या पेरणीला बसताना दिसत आहे. ७५ मिमी पावसानंतर पेरणी ^सलग तीन ते चार दिवस ७५ किंवा १०० मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. खंडीत पावसाच्या शक्यतेमुळे कमी कलावधीच्या वाणांची पेरणी करावी. सरी ओरंबा पद्धतीने पेरणी करावी. पावसाचा खंड पडल्यास पाणी द्यावे. – प्रवीण भोर, तालुका कृषी अधिकारी.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर