ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

हिरुड शहापुर येथील शेतकरी बघणे यांना शेतीनिष्ठ पुरस्कार:शेतकऱ्यांशी आपुलकीचे नाते जपणारे म्हणून ओळख‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नजिकच्या हिरुड, शहापूर येथील युवा, प्रगतशील शेतकरी तसेच दत्तपूर्णा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष उमेश बघणे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशस्वीतेबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात जाऊन बघणे यांचा सत्कार केला. यावेळी प्रगतशील शेतकरी दत्तात्रय किटुकले, सरपंच विजयराव राऊत, गौरव वैद्य, विलासराव देशमुख युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत जावरकर, महेश वैद्य, राहुल डवरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. उमेश बघणे यांनी स्थापन केलेल्या श्री दत्तकृपा फार्मर प्रोड्युसर कंपनी, शहापूर या संस्थेला उत्कृष्ट शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून तीन वर्षांपूर्वी राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने शेतकरी हितासाठी अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी अत्यंत आपुलकीचे नाते जपणारे, नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा अवलंब करणारे आणि शेतकरी विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले शेतकरी म्हणून उमेश बघणे यांचा नावलौकिक आहे. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर