ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

डिटोनेटर तयार करताना कसा झाला स्फोट?:SBL कंपनीच्या स्फोटात 17 जणांचा बळी; सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नागपूरमध्ये आज सकाळी स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या एका स्फोटात तब्बल 17 कामगारांचा बळी गेला. या घटनेत 18 हून अधिक जण जखमी झालेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कंपनीच्या एका अधिकाऱ्याने ही दुर्घटना नेमकी कशी घडली? याची माहिती दिली आहे. डिटोनेटर तयार करत असताना कामगार अंतिम टप्प्यातील क्रिम्पिंग प्रक्रिया करत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली, असे ते म्हणालेत. एसबीएल कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, डिटोनेटर तयार करताना आज सकाळी अचानक स्फोट झाला. कामगार अंतिम टप्प्यातील क्रिम्पिंग प्रक्रिया करत असताना ही दुर्घटना घडली. डिटोनेटर हे मोठ्या स्फोटकाला स्फोट घडवून आणण्यासाठी वापरले जाणारे एक उपकरण आहे. त्यात अत्यल्प प्रमाणात (मिलिग्रॅममध्ये) स्फोटक द्रव्य असते. पण उत्पादन प्रक्रियेत निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास धोका उद्भवण्याची शक्यता असते. अधिकाऱ्यांच्या मते, स्फोट झालेले डिटोनेटर हे नॉन – इलेक्ट्रिक प्रकारातील होते. या प्रकारात विद्युत प्रवाहाऐवजी धक्क्यामुळे (शॉक इफेक्ट) स्फोट होतो. सरकारने पारंपरिक इलेक्ट्रिक डिटोनेटरवर बंदी घातली आहे. सदर डिटोनेटर विद्युत प्रवाह गेल्यावर त्वरित स्फोट घडवू शकत नाही. त्यामुळे ते अधिक धोकादायक मानले जात होते. अशा उपकरणांचा गैरवापर माओवादी किंवा इतर अतिरेकी गटांकडूनही होऊ शकतो. सध्या उद्योग क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर वापरले जातात. या प्रकारात स्फोट घडवण्यासाठी विशेष ‘लॉगर’ उपकरण आवश्यक असते. संबंधित कंपनीच्या सुसंगत लॉगरशिवाय डिटोनेटर सक्रिय होत नाही. एसबीएलचे डिटोनेटरही केवळ कंपनीच्याच अधिकृत लॉगरद्वारेच कार्यान्वित होतात. कंपनीकडून दोन्ही प्रकारचे डिटोनेटर तयार केले जातात. स्फोट झालेले डिटोनेटर हे लष्करी दारुगोळ्यासाठी नव्हे, तर औद्योगिक वापरासाठी वापरले जात होते, असेही या अधिकाऱ्याने यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना मदतीची घोषणा दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे की, नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. याशिवाय संबंधित कंपनी सुद्धा आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबियांना देणार आहे. एसबीएल स्फोटातील जखमींवर तातडीने नागपूर स्थित रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. हे ही वाचा… नागपूर लगतच्या SBL कंपनीत स्फोट:17 ठार, 18 जखमी; दारुगोळा तयार करताना सकाळी घडली घटना, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भयंकर स्फोट झाला आहे. त्यात 17 कामगार ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर