ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

87 वर्षीय डॉक्टरांची 46 लाखांची सायबर फसवणूक:मुंबई पोलिस अधिकारी बनून चोरट्यांनी केली ऑनलाईन फसवणूक

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यात सायबर चोरट्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी करून एका ८७ वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरांची ४६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन जिमखाना भागात राहणाऱ्या या डॉक्टरांना गेल्या महिन्यात २४ मे रोजी सायबर चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी डॉक्टरांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याचे सांगितले. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे, अशी भीती त्यांना दाखवण्यात आली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी डॉक्टरांना धमकावले. घाबरलेल्या डॉक्टरांनी चोरट्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ४६ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक संगीता देवकाते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, एका वेगळ्या घटनेत, बँक अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची चार लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेर परिसरात राहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाला चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांनी बँक खाते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या बहाण्याने चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवली. त्यानंतर चोरट्यांनी पीडित व्यक्तीला एक लिंक पाठवली. ती लिंक उघडताच, चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून चार लाख दहा हजार रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग केली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय खिलारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर