ब्रेकिंग न्यूज
⚡ किती सोसायचं? ‘तो’ रोज दारू पिऊन यायचा अन्…, 30 वर्षांच्या शीतलचं टोकाचं पाऊल, बीडमध्ये खळबळ ✦ ⚡ मारेगावच्या विद्यार्थी चळवळीला नवे नेतृत्व! आनंद काकडे NSUIच्या तालुकाध्यक्षपदी ✦ ⚡ रब्बी हंगामासाठी पाणी हवेय? शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक, अन्यथा पिकांना बसू शकतो फटका ✦ ⚡ Tiger Shroff : धडाधड ७ गोळ्या झाडूनही सेफ…टार्गेटवर असूनही टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला! समोर आली शॉकिंग म… ✦ ⚡ डेटिंग ॲपवर ओळख, आधी संबंध ठेवले, मग महिलेनं केलं भयंकर कांड , छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना ✦ ⚡ IND vs ZIM : 54 बॉलमध्ये नुसती मॅच जिंकली नाही तर केला रेकॉर्ड, स्मृतीच्या कॅप्टन्सीत पहिलाच मालिका विजय ✦ ⚡ मारेगावात युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन! ✦ ⚡ ‘आता पुढचा नंबर तुझा’, प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील तरुणीला जीवे मारण्याची धमकी ✦ ⚡ मध्यरात्रीची वेळ, अनोळखी स्पर्श पाहून शेतकऱ्याची पत्नी ओरडतच उठली, त्यानं तोंडात बोळा कोंबला अन्…, सोलापू… ✦ ⚡ News 18 Marathi Headlines | 17 OCT | 9 AM | Abhijit Dipke | Fadnavis | Sanap | Maharashtra Politics
SP News Maregaon

किती सोसायचं? ‘तो’ रोज दारू पिऊन यायचा अन्…, 30 वर्षांच्या शीतलचं टोकाचं पाऊल, बीडमध्ये खळबळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड: दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने जीवन संपवलं. अंबाजोगाई तालुक्यातील परळीवेस भागातील अण्णाभाऊ साठे नगर येथे ही दुर्दैवी घटना घडली. शीतल बापूराव लोंढे (वय 30) असे मृत विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी पती बापूराव भगवान लोंढे (रा. कावळ्याचीवाडी, ता. परळी) याच्याविरोधात परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं घडलं काय?

मनोज रंगनाथ जोगदंड (वय 65) यांची पुतणी शीतल हिचा 2020 मध्ये बापूराव लोंढे याच्यासोबत विवाह झाला था. दोघेजण ऊसतोडीचं काम करून उदरनिर्वाह करत होते. लग्नानंतर सुरुवातीला संसार सुखाचा सुरू होता. मात्र, पुढे पतीच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे घरात वाद होऊ लागले. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार मनोज हा दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नीशी भांडण असे. त्यामुळे त्यांच्या घरात नेहमीच तणावाचे वातावरण असायचे.

शिक्षकी पेशाला काळीमा! बीडमध्ये 4 मुलींसोबत विकृत कृत्य, नराधम शिक्षकाला अटक

पतीच्या रोजच्या त्रासाला शीतल कंटाळली होती. दारूच्या नशेत होणारी भांडणे आणि शिवीगाळ यामुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागत होता. पतीच्या वागण्यामुळे शीतल पूर्णपणे त्रस्त झाली होती. अखेर हा त्रास सहन न झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

17 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मनोज दारू पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने शीतलसोबत वाद घातला. काही वेळाने दोघांमधील भांडण थांबले आणि दोघेही घरात झोपण्यासाठी गेले. मात्र रात्री उशिरा घरातून जोरात रडण्याचा आवाज आल्याने नातेवाइकांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता शीतलने गळफास घेतल्याचे दिसून आले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.

या घटनेनंतर शीतलच्या नातेवाइकांनी पतीच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोज जोगदंड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत. एका संसाराचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर