ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

सलमान खान भारताचा नागरिक नाही का?:तो संघाच्या कार्यक्रमाला गेला तर बिघडले कुठे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला लावलेल्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या चर्चेवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. “सलमान खान हा भारताचा नागरिक आहे. त्यामुळे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गेला, तर त्यात चुकीचे काय आहे?” असा थेट सवाल उपस्थित करत शिंदे यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले आहे. २०२५-२६ हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम, व्याख्यानमाला आणि शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत नुकतीच सरसंघचालक मोहन भागवत यांची व्याख्यानमाला पार पडली. मोहन भागवतांच्या या व्याख्यानमालेत अभिनेता सलमान खानसह अनेक बॉलिवूडमधील मंडळींनी हजेरी लावली होती. तर संघाच्या या कार्यक्रमाला सर्व मंडळी प्रेमाखातर नाही, तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती, अशी टीका विरोधकांनी केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे‌? प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा आणि त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, “आरएसएस या संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली अनेक दशके आपण या संस्थेकडे एक देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना म्हणून पाहत आलो आहोत. कट्टर देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम काय असते, हे जगाने संघाच्या माध्यमातून अनुभवले आहे.” संघाच्या सामाजिक कार्यावर भाष्य करताना शिंदे पुढे म्हणाले की, “जेव्हा जेव्हा देशावर संकट येते, मग ती नैसर्गिक आपत्ती असो किंवा इतर कोणतीही आपदा, तेव्हा संघाचे स्वयंसेवक स्वत:हून पुढे येतात आणि मदतकार्य करतात. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली संघ सातत्याने राष्ट्रभक्तीचा विचार रुजवण्याचे काम करत आहे. अशा राष्ट्रप्रेमी संघटनेच्या कार्यक्रमाला सलमान गेला असेल, तर त्यात गैर काय?” अशी विचारणाही एकनाथ शिंदे यांनी केली. या विषयावर राजकारण करायला नको सलमान खानच्या उपस्थितीचे समर्थन करताना शिंदे यांनी त्याच्या कौटुंबिक संस्कृतीचाही दाखला दिला. ते म्हणाले, “सलमान खान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब भारतीय संस्कृती मानणारे आहे. त्यांच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. तो एक मुंबईकर आहे आणि भारताचा नागरिक आहे. संघाचा कार्यक्रम मुंबईत असल्याने तो तिथे गेला. त्यामुळे या विषयावर नाहक राजकारण करणे चुकीचे आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर