ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मुंबईत धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार:पावसाचे पाणी आत आल्याने दरवाजा बंद करण्यावरून वाद; तरुणाची चाकू भोसकून हत्या

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असतानाच, पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. चालत्या लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात केवळ लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या क्षुल्लक वादातून एका २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे. मयंक लोहार असे मृत तरुणाचे नाव असून, मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अंधेरी ते बोरिवली स्थानकांदरम्यान हा रक्तरंजित थरार घडला. मंगळवारी रात्री मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात पावसाचे पाणी आणि तुषार आत येत होते. यामुळे डब्यात बसलेल्या काही प्रवाशांनी दरवाजा बंद करण्यास सांगितले. याच कारणावरून मयंक आणि दुसऱ्या एका प्रवाशामध्ये बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता हा वाद इतका विकोपाला गेला की, समोरच्या माथेफिरू प्रवाशाने संतापाच्या भरात स्वतः जवळील धारदार चाकू काढून मयंकवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, रक्तबंबाळ झालेल्या मयंकचा ट्रेनमध्येच तडफडून मृत्यू झाला. मारेकरी फरार; पोलिसांकडून सीसीटीव्हीचा तपास सुरू मयंकवर वार केल्यानंतर डब्यात एकच गोंधळ उडाला, आरोपी अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेत पसार झाला. याप्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. पोलिस सध्या ट्रेनमधील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचे जबाब नोंदवून घेत असून, अंधेरी ते बोरिवली दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवाशांमध्ये घबराट; ४ महिन्यांतील ही दुसरी घटना या घटनेमुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मुंबईकरांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत पश्चिम रेल्वे मार्गावर घडलेली ही अशी दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी देखील बोरिवली स्थानकाजवळ लोकलच्या दरवाज्यात उभे राहण्याच्या वादातून एका प्रवाशाची अशीच चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. लागोपाठ घडणाऱ्या या जीवघेण्या प्रकारांमुळे दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या मनात कमालीची दहशत निर्माण झाली आहे. खासदार वर्षा गायकवाडांचा सरकारला सवाल दरम्यान, मुंबईच्या काँग्रेस पक्षाच्या खासदार यांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. बजेट वाढलं, घोषणा वाढल्या, जाहिराती वाढल्या… पण रेल्वे प्रवाशांची सुरक्षा कुठे आहे? असा सवाल वर्षा गायकवाड
यांनी केलाय. त्या म्हणाल्या, “बोरिवलीजवळ धावत्या लोकलमध्ये एका तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्येच आता प्रवाशांचे जीव सुरक्षित राहिलेले नाहीत, हे अत्यंत भयावह आहे. दररोज कोट्यवधी मुंबईकर जीव मुठीत धरून प्रवास करतात, पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची?” “रेल्वे प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांचे धैर्य इतके वाढले आहे की आता भरधाव लोकलमध्येही खून करण्याची हिंमत त्यांना होत आहे. रेल्वे सुरक्षेवर लाखो कोटी खर्च होतात. मग गुन्हेगार लोकलमध्ये चाकू घेऊन कसे चढतात? CCTV, RPF, GRP आणि सुरक्षा यंत्रणा नेमक्या आहेत कुठे? धावत्या लोकलमध्ये तरुणाची चाकूने हत्या होते, म्हणजे सरकारच्या सुरक्षा दाव्यांचा फुगा फोडण्यासाठी आणखी कोणत्या पुराव्याची गरज आहे?” अशी विचारणा वर्षा गायकवाड यांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर