ब्रेकिंग न्यूज
⚡ अखेर बेपत्ता चिमुकला नाल्यात मृतावस्थेत! ✦ ⚡ Mumbai Flyover: मुंबईकरांसाठी मोठी खूशखबर! वाहतूक कोंडीतून सुटका, वेळ वाचवणारे हे ३ महत्त्वाचे उड्डाणपूल आज… ✦ ⚡ ताटातील भाकरीला महागाईच्या झळा, ज्वारीचे दर शंभरीपार, 30 दिवसांत मार्केटमध्ये मोठे उलटफेर, Video ✦ ⚡ डोकेदुखीने त्रस्त महिला उपचारासाठी गेली, डॉक्टरने गुंगीच्या गोळ्या दिल्या अन्…, भयंकर कृत्यानं छ. संभाजीन… ✦ ⚡ 3 नव्हे चौघे करणार होते टायगर श्रॉफवर हल्ला, आदल्या दिवशी झाला मोठा कांड, चौथा हल्लेखोर कुठे गायब? ✦ ⚡ पत्रकार भैय्याजी कनाके यांना मातृशोक; प्रभाताई कनाके यांचे निधन ✦ ⚡ दसरा व दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च! ✦ ⚡ Badlapur News: बदलापूर हादरलं! शिवसेना संपर्क कार्यालयाबाहेर तरुणावर सपासप वार, मध्यरात्री नेमकं काय घडलं?… ✦ ⚡ किती सोसायचं? ‘तो’ रोज दारू पिऊन यायचा अन्…, 30 वर्षांच्या शीतलचं टोकाचं पाऊल, बीडमध्ये खळबळ ✦ ⚡ मारेगावच्या विद्यार्थी चळवळीला नवे नेतृत्व! आनंद काकडे NSUIच्या तालुकाध्यक्षपदी
SP News Maregaon

Mumbai Flyover: मुंबईकरांसाठी मोठी खूशखबर! वाहतूक कोंडीतून सुटका, वेळ वाचवणारे हे ३ महत्त्वाचे उड्डाणपूल आज…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहरासह उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे शीव (सायन), विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोडमार्गावरील तीन नवे उड्डाणपूल आज गुरुवारी (२२ ऑक्टोबर) मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १ वाजता दृकश्राव्य (व्हर्च्युअल) माध्यमातून या तिन्ही पुलांचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, महापौर रितू तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

शीव (सायन) उड्डाणपूल :

शीव रेल्वे स्थानकाजवळील ११२ वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल असुरक्षित घोषित झाल्याने त्याची नवी उभारणी करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला या ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेच्या विस्तारातील सर्वात मोठा अडथळा या नव्या पुलामुळे दूर झाला आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी २०२७ ची डेडलाईन असताना सर्व अडचणींवर मात करत हे काम तब्बल चार महिने आधीच पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पाचा सर्व खर्च रेल्वे विभागाने केला आहे.

विद्याविहार उड्डाणपूल :

हा पूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्गाला थेट जोडतो. यामुळे विद्याविहार ते घाटकोपर दरम्यानचा प्रवासाचा वेळ ३० मिनिटांवरून थेट १० मिनिटांवर येईल. तसेच घाटकोपर उड्डाणपुलावरील अतिरिक्त वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.

गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग (GMLR) उड्डाणपूल:

गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शनजवळ १.२६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. हा पूल जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग ते संतोषनगर परिसरातील दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गाला जोडतो. या पुलामुळे गोरेगाव पूर्व, दिंडोशी न्यायालय परिसर आणि चित्रनगरीच्या आसपासच्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मोठी सुटका होणार आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर