ब्रेकिंग न्यूज
⚡ अखेर बेपत्ता चिमुकला नाल्यात मृतावस्थेत! ✦ ⚡ Mumbai Flyover: मुंबईकरांसाठी मोठी खूशखबर! वाहतूक कोंडीतून सुटका, वेळ वाचवणारे हे ३ महत्त्वाचे उड्डाणपूल आज… ✦ ⚡ ताटातील भाकरीला महागाईच्या झळा, ज्वारीचे दर शंभरीपार, 30 दिवसांत मार्केटमध्ये मोठे उलटफेर, Video ✦ ⚡ डोकेदुखीने त्रस्त महिला उपचारासाठी गेली, डॉक्टरने गुंगीच्या गोळ्या दिल्या अन्…, भयंकर कृत्यानं छ. संभाजीन… ✦ ⚡ 3 नव्हे चौघे करणार होते टायगर श्रॉफवर हल्ला, आदल्या दिवशी झाला मोठा कांड, चौथा हल्लेखोर कुठे गायब? ✦ ⚡ पत्रकार भैय्याजी कनाके यांना मातृशोक; प्रभाताई कनाके यांचे निधन ✦ ⚡ दसरा व दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च! ✦ ⚡ Badlapur News: बदलापूर हादरलं! शिवसेना संपर्क कार्यालयाबाहेर तरुणावर सपासप वार, मध्यरात्री नेमकं काय घडलं?… ✦ ⚡ किती सोसायचं? ‘तो’ रोज दारू पिऊन यायचा अन्…, 30 वर्षांच्या शीतलचं टोकाचं पाऊल, बीडमध्ये खळबळ ✦ ⚡ मारेगावच्या विद्यार्थी चळवळीला नवे नेतृत्व! आनंद काकडे NSUIच्या तालुकाध्यक्षपदी
SP News Maregaon

ताटातील भाकरीला महागाईच्या झळा, ज्वारीचे दर शंभरीपार, 30 दिवसांत मार्केटमध्ये मोठे उलटफेर, Video

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे: राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याचा फटका आता धान्य बाजारालाही बसू लागला आहे. रोजच्या जेवणातील महत्त्वाचा भाग असलेल्या ज्वारीच्या दरात मोठी वाढ झाली असून, पुण्यातील मार्केट यार्डमध्ये ज्वारीचे दर शंभरीपार गेले आहेत. उत्पादनात घट झाल्याने बाजारात ज्वारीची आवक कमी झाली आहे. दुसरीकडे, ग्राहकांकडून मागणी कायम असल्याने दरवाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अवघ्या एक ते दीड महिन्यांपूर्वी ५८ ते ६० रुपये किलो मिळणारी पहिल्या प्रतीची ज्वारी आता ९५ ते १०० रुपये किलो झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला महागाईची झळ बसत आहे.

पुणे मार्केट यार्डमधील नितीन कुमार अँड कंपनीचे नितीन नहार हे गेल्या ४० वर्षांपासून धान्य व्यवसायात आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा देशभरात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ज्वारीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांकडेही ज्वारीचा पुरेसा साठा नसल्याने बाजारात आवक घटली आहे. परिणामी, ज्वारीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

नोकरीचा नाद सोडला अन् सुरू केली खेकडा शेती, सांगलीच्या इंजिनिअरची लाखोंची कमाई, पैशाचा फॉर्म्युलाच सांगितला…

मार्केट यार्डमधील ज्वारीच्या दरात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मोठा फरक दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये पहिल्या प्रतीच्या ज्वारीचा दर ५८ ते ६० रुपये किलो होता. ऑक्टोबरमध्ये तो वाढून ९५ ते १०० रुपये किलो झाला आहे. दुसऱ्या प्रतीच्या ज्वारीचे दरही ४५ ते ५० रुपयांवरून ६० ते ६५ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर दुरई ज्वारीचे दर २७ ते ३० रुपयांवरून ३७ ते ४५ रुपये किलो झाले आहेत.

क्विंटलच्या हिशेबाने पाहिल्यास, पहिल्या प्रतीच्या ज्वारीचे दर सप्टेंबरमध्ये ५,८०० ते ६,००० रुपये होते. आता ते ९,५०० ते १०,५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ज्वारी खरेदी करताना ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

ज्वारीच्या दरातील वाढ लगेच कमी होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. साधारण नऊ महिन्यांनंतर पुढील हंगामातील ज्वारीची उपलब्धता वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, नवीन ज्वारी बाजारात येण्यासाठी सुमारे १४ ते १५ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे नहार यांनी सांगितले. त्यामुळे तोपर्यंत ज्वारीचे दर कमी होतीलच, असे सांगता येणार नाही.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर