ब्रेकिंग न्यूज
⚡ News18 Marathi Headlines | 13 NOV | 9 AM | Sanjay Shirsat News | NCP Merger | Shiv Sena | Fadnavis ✦ ⚡ अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक करेल मालामाल, मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांनी काय करावं? Video ✦ ⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं…
SP News Maregaon

नसरापूर प्रकरण- नराधमाला फाशीची शिक्षा:16 दिवसांत आरोपपत्र, 55 हून अधिक साक्षीदार; गुन्हा घडल्यापासून अवघ्या 60 दिवसांत फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे (वय 65) या नराधमाला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (सोमवारी, 29 जून) मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. विशेष म्हणजे, गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांत आणि खटल्याची सुनावणी केवळ 16 दिवसांत पूर्ण करून निकाल देण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच आणि सर्वात जलदगतीने निकाली लागलेला खटला ठरला आहे. चार दिवसांपूर्वी (25 जून) न्यायालयाने कांबळेला दोषी ठरवले होते, मात्र शिक्षेचा निर्णय राखून ठेवला होता. आज अंतिम निकाल देताना न्यायाधीशांनी नोंदवलेली निरीक्षणे अत्यंत हादरवून टाकणारी होती. न्यायाधीशांनी नोंदवलेली गंभीर निरीक्षणे निकालाचे वाचन करताना विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीच्या क्रूरतेवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. कायद्याचे दाखले आणि विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 12 निकालांचे दाखले दिले. या सर्व निकालांचे नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य होते. न्यायाधीशांनी अंतिम निकाल देताना ‘निर्भया प्रकरण’, ‘बशर अली केस’, ‘शंकर खाडे केस’ आणि ‘बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब’ या प्रकरणांचे दाखले दिले. “शांत डोक्याने कट रचून केलेली हत्या, गुन्ह्यातील क्रूरता आणि या घटनेमुळे समाजाला बसलेला धक्का हे सर्व घटक फाशीच्या शिक्षेसाठी पात्र ठरतात. स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी असहाय्य बालिकेसोबत केलेले हे कृत्य अमानवी आहे,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. तपास यंत्रणा आणि टीम वर्कचे कौतुक या निकालादरम्यान न्यायालयाने पोलीस आणि तपास यंत्रणांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. “गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १६ दिवसांत पोलिसांनी भक्कम आरोपपत्र दाखल केले. उन्हाळ्याच्या सुट्टीतही कोर्टाने या खटल्याला पूर्ण वेळ दिला. 55 साक्षीदार तपासले गेले. डॉक्टर, सायबर तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीमने वाखाणण्याजोगी कामगिरी केली. पोलिसांनी उत्कृष्ट तपास केल्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.” “असा जलद न्याय मिळणे हे एक स्वप्न असते, जे सर्वच प्रकरणांत शक्य होत नाही. मात्र, या प्रकरणातील टीम वर्क आणि विशेष सरकारी वकिलांचा पाठपुरावा सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण आहे,” असे न्यायाधीश म्हणाले. समाजमनावरील परिणाम या घटनेने समाजमनावर अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणाम केले होते. संतापलेल्या जमावाने कायद्यावरील विश्वास उडाल्याच्या भावनेतून मुंबई-बंगळूर महामार्ग रोखून धरत आरोपीला त्यांच्या हवाली करण्याची मागणी केली होती. अखेर कायद्याने आणि न्यायव्यवस्थेने या नराधमाला फाशीच्या फासावर लटकवण्याचा निर्णय देऊन समाजाला मोठा दिलासा दिला आहे. या निकालामुळे अपहरण, अत्याचार आणि हत्या तसेच पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आरोपी भीमराव कांबळेला त्याच्या क्रूर कृत्याची सर्वोच्च शिक्षा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. आरोपीने मांडला होता वयाचा मुद्दा; न्यायालयाने फेटाळला सुनावणीदरम्यान आरोपीच्या बाजूने त्याच्या वाढत्या वयाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. वयाचा विचार करून फाशीऐवजी सौम्य शिक्षा द्यावी, अशी विनंती बचाव पक्षाने केली. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला नसल्याची माहिती समोर आली आहे. मेडिकल अहवालातील धक्कादायक निष्कर्ष सरकारी पक्षाने न्यायालयासमोर सादर केलेल्या मेडिकल अहवालानुसार, आरोपीने चिमुरडीवर अत्यंत क्रूरपणे लैंगिक अत्याचार केले. एवढेच नव्हे तर, तिचा मृत्यू झाल्यानंतरही अत्याचार सुरूच ठेवल्याचा गंभीर दावा सरकारी पक्षाने केला. या अहवालातील निष्कर्षांमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. १ मे रोजी घडली होती घटना १ मे रोजी नसरापूर येथे सुमारे ३९ मिनिटांच्या कालावधीत आरोपीने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात संताप व्यक्त झाला होता. विविध ठिकाणी आंदोलने झाली आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. फास्ट ट्रॅक न्यायालयात वेगवान सुनावणी राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याचा निर्णय घेतला. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १६ दिवसांत आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयात वेगाने सुनावणी पार पडली. या खटल्यात ५५ हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजसह विविध तांत्रिक पुरावेही न्यायालयासमोर सादर करण्यात आले. आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. न्यायालय परिसरात नागरिकांचीही मोठी गर्दी झाली. मागील सुनावणीत न्यायालयात काय घडले? भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खून खटल्यात पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी ६५ वर्षीय नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळेला दोषी ठरवले. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला थेट पिंजऱ्यात उभे करून, “तू तो प्रसंग आठव आणि तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे?” असा थेट सवाल केला. त्यावर या निर्लज्ज नराधमाने कोर्टातही स्वतःचा बचाव करत अपघाताचा खोटा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. संबंधित बातमी वाचा… भीमराव कांबळे आता फासावर चढा!:न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर चिमुरडी अत्याचारप्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय घडलं पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या 65 वर्षीय भीमराव कांबळे या नराधमाला आज (29 जून) पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा सुनावली. विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी राज्याला हादरवून सोडणाऱ्या प्रकरणात हा ऐतिहासिक निकाल दिला. हा खटला राज्यातील सर्वात जलदगतीने चाललेला खटला ठरला असून, गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत आणि खटल्याच्या सुनावणीच्या १६ दिवसांत हा निकाल लागला आहे. येथे वाचा सविस्तर बातमी अशा नराधमांना भर चौकात फाशी द्या: नसरापूर निकालावर सुप्रिया सुळेंसह राजकीय नेत्यांनी दिल्या तीव्र प्रतिक्रिया पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज ‘मृत्युदंडाची’ (फाशीची) शिक्षा सुनावली आहे. या ऐतिहासिक आणि अत्यंत कठोर निकालामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून समाधान व्यक्त होत आहे. चार दिवसांपूर्वीच न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते आणि आज शिक्षेचा अंतिम निर्णय जाहीर केला. या निकालावर राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
नसरापूर खटला:आरोपी भीमराव कांबळे दोषी, कोर्ट 29 जूनला सुनावणार अंतिम शिक्षा; वाचा प्रकरणाची टाइमलाइन संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भोर तालुक्यातील नसरापूर चिमुकली अत्याचार आणि खून खटल्यात आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असून, सरकारी वकिलांनी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. न्यायालयाने हा गुन्हा ‘अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी’ असल्याचे मान्य केले आहे. मात्र, नराधम भीमराव कांबळेला नेमकी कोणती शिक्षा दिली जाणार, याचा अंतिम फैसला आता सोमवार, २९ जून रोजी सुनावला जाणार आहे. त्यामुळे या क्रूरकर्म्याला फाशी मिळणार की जन्मठेप, यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला आता २९ जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर