ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

संभाजीनगर-जालना जागेवर शिवसेनेचा दावा;‎ पालकमंत्री म्हणतात, येथे आम्हीच जिंकणार:शिंदेसेनेकडून माजी महापौर नंदकुमार घोडेले, विद्यमान उपमहापौर राजेंद्र जंजाळ इच्छुक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर-जालना आणि ‎परभणी-हिंगोली या दोन स्थानिक स्वराज्य संस्था ‎‎मतदारसंघांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. ‎‎छत्रपती संभाजीनगर-जालना ही जागा महायुतीत ‎‎शिवसेनाच लढवणार असल्याचा दावा पालकमंत्री ‎‎संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेकडून ‎‎सध्याचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि माजी ‎‎महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक ‎‎पदाधिकारी इच्छुक आहेत. विधान परिषदेचे‎ आमदार अंबादास दानवे हे यापूर्वी आमदार होते. ‎त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या जागेसाठी ‎निवडणूक जाहीर केली आहे. 18 जून रोजी मतदान ‎होणार आहे. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, ही जागा आम्हीच ‎लढणार आहोत. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा ‎होईल. शिवसेना महायुतीकडून आमचाच उमेदवार‎ रिंगणात असेल. मात्र, उमेदवाराचे नाव निश्चित‎ झाले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम‎ निर्णय घेतील, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले. ‎छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे नगरपालिकेत ‎54, महानगरपालिकेत 13 आणि जिल्हा परिषदेत 21 ‎सदस्य आहेत. या निवडणुकीसाठी अनेक दावेदार‎ आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले कैलास‎ गोरंट्याल यांच्या नावाचीही चर्चा आहे. भाजपचे संख्याबळ वाढले- सावे‎ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये‎ भाजपची ताकद वाढल्याने यावर भाजपचा दावा‎ असल्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी ‎सांगितले. पक्षश्रेष्ठी यासंबंधी निर्णय घेतील, परंतु हा ‎मतदारसंघ आता भाजप सक्षमपणे लढवून जिंकू‎ शकतो, असा दावाही मंत्री सावे यांनी केला आहे.‎ मविआकडून उद्धवसेना लढणार‎- दानवे महाविकास आघाडीकडून गेल्या वेळी अंबादास दानवे या‎ जागेवरून आमदार होते. त्यामुळे ही जागा आम्हीच लढवणार‎ असल्याचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले. आमचे ‎संख्याबळ कमी दिसत असले, तरी महाविकास आघाडी म्हणून ‎आम्ही संपूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवू आणि जिंकू,’ असा‎विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.‎ आकडेमोड सुरू‎ बहुमताचा अंदाज आल्यानंतर भाजप हक्काचा‎ विधान परिषदेमधील एक सदस्य कमी होऊ देणार‎ नाही. यासाठी भाजपने आकडेमोड सुरू केली आहे.‎भाजप स्वबळावर ही निवडणूक जिंकेल, असा‎ विश्वास श्रेष्ठींना वाटत आहे.‎ भाजपकडून सावध पाऊल‎ नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत भाजप,‎शिवसेनेची युती तुटली होती. जिल्हा परिषदेत ‎शिंदेसेनेने भाजपला अंधारात ठेवून बी फॉर्म दिले ‎होते. दोन्ही ठिकाणी भाजपची सरशी झाली. जालना‎ महापालिकेत बहुमताने भाजपची सत्ता आली. या‎ पार्श्वभूमीवर भाजप आता ताकही फुंकूण पित आहे.‎ परभणी-हिंगोलीवरही उद्धवसेनेचा दावा‎ परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून‎ देखील उद्धवसेनाच निवडणूक लढणार असल्याचे आमदार‎ राहुल पाटील यांनी स्पष्ट केले. गेल्या निवडणुकीत‎ शिवसेनेचेच विप्लव बजोरिया येथून निवडून आले होते.‎ त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा आमच्याकडेच ‎राहील, असे त्यांनी सांगितले.‎ नंदकुमार घोडेले इच्छूक उपमहापौर राजेंद्र जंजाळ या संदर्भात म्हणाले, उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय‎ पक्षश्रेष्ठी घेतील. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ ‎असल्याने महायुतीचाच उमेदवार विजयी ‎होईल. दुसरीकडे, माजी महापौर नंदकुमार‎ घोडेले यांनीही या जागेसाठी इच्छा दर्शवली‎ आहे.‎
‎‎‎‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर