संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आशिष झाडे यांच्या नेतृत्वात निवेदन.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी:-शालेय वेळेत शनिवार व सोमवाराला बस नसल्याने अडेगाव, खातेरा, वेडद या गावातील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने दि. 11 ऑक्टोंबर ला वणी येथील बस आगर येथे धडक देऊन शालेय वेळेत बस सुरु करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आशिष झाडे यांच्या नेतुत्वात आगर व्यवस्थापक यांना निवेदन देऊन करण्यात आली.
मुकूटबन परिसरातील अनेक विद्यार्थी शाळा आणि कॉलेज करिता मुकुटबन येथे जावे लागत आहे. सोमवारला व शनिवारला शालेय वेळेत बस नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना खाजगी प्रवास भाडे परवडणारे नसल्याने. त्याकरिता मानव विकास मिशन अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बससेवा विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आल्या.
मात्र अनेक दिवसापासून या बसेस शालेय वेळेत नसून विद्यार्थ्यासाठी जाण्याकरिता अडथळा निर्माण होत आहेत.
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता योग्य उपाय योजना करावी यासाठी वणी आगर व्यवस्थापकला संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आशिष झाडे यांच्या सह 50 विद्यार्थ्यानी धडक दिली असता आगर प्रमुखाशी चर्चा करुण निवेदन सादर करण्यात आले.यावेळेस संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आशिष झाडे, दत्ता दोहे, नितेश ठाकरे, वैभव सूर, समाधान पारखी, याच्यासह अनेक शालेय विद्यार्थी हजर होते.


