प्रा. देवीकास गायकवाड यांच्या “शिक्षण आमचा देव” या काव्यसंग्रहाचे औरंगाबाद येथे प्रकाशन.

0
50

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी या आदीवासी बहूल तालुक्यातील प्रा. देवीदास गायकवाड यांच्या “”शिक्षण आमचा देव” या काव्यसंग्रहाचे नुकतेच औरंगाबाद येथे शब्दगंध समुह प्रकाशनाच्या वतीने सीने अभेनेत्री कु.रूपाली पवार आणि प्रसिद्ध साहीत्यीक प्रा. डॉ. आनंद अहीरे यांच्या हस्ते मौलाना आझाद रीसर्च सेंटर, औरंगाबाद येथे प्रकाशन सोहळा पार पडला.

“शिक्षण आमचा देव” हा प्रा. देवीदास गायकवाड, यांचा पहीलाच काव्यसंग्रह असुन शिक्षणाचे महत्व विशद करणाऱ्या ४२ कवीता सदर काव्यसंग्रहामध्ये आहे. सदर काव्यसंग्रहाला प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे, अमरावती यांची प्रस्तावना तर शिक्षण उपसंचालक दिपक चवने यांचा सुभेच्छा संदेश लाभला आहे. ग्रामीन व गरीब विद्यार्थ्यांकरीता प्रेरणादायी असा काव्यसंग्रह आहे. प्रा. गायकवाड यांचे “पेटला वणवा”, “जिवन सगर”, हे दोन काव्यसंग्रह व “इंग्रजी ग्रामरचा राजमार्ग” ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

प्रा. देवीदास गायकवाड हे हाडाचे शिक्षक असून ते अनेक पुरस्कार प्राप्त कवी आहेत. त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. “शिक्षण आमचा देव” हा मराठी भाषेतील अत्यंत नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी काव्यसंग्रह आहे. त्यांच्या या साहीत्यीक यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here