मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी विविध ठिकाणी सपन्न झाली. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित पुण्यतिथी सोहळ्यात स्थानिक गुरुदेव सेवकांनी प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून जनजागृती केली. यामध्ये मार्डी, किन्हाळा, पिसगाव मारेगाव, या सह विविध गावाचा समावेश होता.
मार्डी येथील गुरुदेव सेवा महिला मंडळाच्या वतीने सुरेल आवाजात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजन गायनाने गुरुदेव भक्तांना मंत्रमुग्ध केले. तसेच येथील गुरुदेव सेवा मंडळा कडून गुरुकुंन्झ मोझरी येथे मार्डी मार्गा वरून जाणाऱ्या गुरुदेव भक्तासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सूत्रसंचालन संतोष लिहीतकर यांनी केले. तर महिला गुरुदेव सेवा मंडळाच्या तथा मार्डी ग्रामपंचायत सदस्या नंदा धानफुले मजरा ग्रामपंचायत सदस्य संजय किनाके यांनी राष्ट्रसंताच्या पुण्यतिथीची भजन गायन करून सुरुवात केली. पिसगाव येथील जगनाथ बाबा देवस्थानात गुरुदेव सेवा मंडळाचे मारोती गौरकार, यांनी प्रबोधन करून पुण्य तिथी सोहळ्याची सुरुवात केली किन्हाळा, मारेगाव येथेही पुण्यतिथी सोहळा गुरुदेवसेवा मंडळाच्या वतीने संपन्न झाला.