मारेगांव तालुका पत्रकार संघाचे निववेदन.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
वणी येथील पत्रकार आसिफ शेख यांचे घरी पहाटे चोरट्याने प्रवेश करीत लोखंडी रॉडने त्यांचेवर प्राणघातक हल्ला चढविला.यात गंभीर जखमी झालेल्या पत्रकारावरील हल्ल्याचा मारेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करीत आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वणी येथील एका मराठी वृत्तपत्राचे बातमीदार आसिफ शेख यांचे गाडगेबाबा चौक वणी येथील निवासी दिनांक 12 ऑक्टोंबर 2022 रोज बुधवारला पहाटे 5 वाजता चोरट्याने त्यांच्या राहते घरी प्रवेश केला.ते मॉर्निंग वॉक साठी बाहेर निघत असताना आसिफ शेख यांचेवर चोरट्याने रॉड ने हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यांचेवर वणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मारेगांव तालुका पत्रकार संघातर्फे मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांना निववेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.यावेळी भास्करराव धानफुले यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष सुमित हेपट, सचिव माणिक कांबळे, उप तालुका अध्यक्ष भास्कर राऊत,मोरेश्वर ठाकरे, प्रसिद्धी प्रमुख आनंद नक्षणे, सुरेश पाचभाई,भैयाजी कनाके,सुरेश नाखले,गजानन आसुटकर,धनराज खंडरे,सुमित गेडाम, गजानन देवाळकर व आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.