मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यांतील पांडवदेवी (तिवसाळा) हे देवस्थान हे वणी यवतमाळ रोडवरील जळका स्टॉप वरुण दक्षिणेस 1की. मी. अंतरावर आहे.श्रीशेत्र पांडवदेवी देवस्थान ट्रस्ट, तिवसाळा र.नं. ओ- 723 येथे होणारा गोवर्धन उत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोज मंगळवारला सुर्यग्रहण असल्यामुळे ही तिथी बदलविण्यात आली होती.आज बुधवार दिनांक 26 ऑक्टोबर 2022 ला गोवर्धन उत्सव साजरा करण्यात येत आहे.
या ठिकाणी मोठया प्रमाणात भाविकभक्ताची गर्दी होतात पारंपारिक पद्धतीने गोवर्धन उत्सव साजरा करतात येतो परिसरातील नागरिकांना सह बाहेर जिल्ह्यातील चंद्रपूर, नागपुर येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होतात ढोल ताशांच्या गजरात गाईंची सजावट करून मिरवणूक कडण्यात येतात मंदिरा समोरील जागेवर परिसराती असंख्य गाईंना या ठिकाणी जमा होतात.
आणि फटाक्यांची आतषबाजी केली जाते.ही यात्रा 1 दिवसांची असुन सकाळी 7 वाजता पासून पशुधन पालक गाईंची सजावट करून पांडवदेवी मंदिराच्या दिशेने निगतात त्या नंतर यात्रेला सुरुवात होते. आणि दुपारी सुमारे 12:30 ते 1 वाजता गोवर्धन पूजा करून परिसरातील नागरीक आपापल्या गाईंना घेवुन गावाकडे वाज्या गाज्यात परततात.

पांडवदेवी (तिवसाळा) हे देवस्थान हेमाडपंती पुरातन मंदिर असून निसर्गाच्या सान्निध्यात आहे त्या मुळे नागरीक मोबाईल मध्ये येथील दृष कैद करताना दिसतात.


