म्हैसदोडका येथील 45 वर्षीय ईसमाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

0
81

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील सुमारे 45 वर्षीय ईसमाने गावातीलच एका व्यक्तीच्या शेतात जाऊन कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची   घटना काल दिनांक 25 ऑक्टोंबर 2022 रोज मंगळवारला रात्री 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जिवन गणपत जांबुळकर वय सुमारे 45 वर्ष असे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असुन तो गावातली एका शेतकऱ्याकडे साल गळी मनून शेतात काम करायचा घरच्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्याला लगेच ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल केले. पण तेथील डॉक्टरांनी त्या इसमास मृत्यू घोषीत केले.

बातमी लिहे पर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही. मृतक जिवन यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहीत मुली,असा आप्तपरीवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गर्शनाखाली जामदार भालचंद्र मांडवकर करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here