चिंचाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

0
67

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथील शेतकऱ्याने नापिकी आणि जीवनाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून स्वतःचे जीवन संपविले. ही घटणा दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोज रविवारला सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की…
पंढरी गोविंदा नैताम वय सुमारे 55 वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून ते सकाळी घरुन 7 वाजताच्या सुमारास शेताकडे गेले होते.त्यांनी शेतात जाऊन मोनोसिल नावाचे कीटकनाशक प्राशन करुन वरूड-चिंचाळा रत्यावर पडून होते.

गावातील काही शेतकरी त्या रस्त्यांनी शेतात जात असताना तो रस्त्यावर पडून असल्याचे निदर्शनास येताच घटना उघडकीस आली.याची माहिती त्यांनी कुटुंबातील सदस्यांना दिली.माहिती मिळताच त्याला लगेच ग्रामीण रूग्णालय मारेगाव येथे दाखल केले पण तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांच्या नावाने 2 एकर शेती आहे. यावर्षी पडलेला अती वृष्टी व ओला दुष्काळ आणि मागील काही वर्षांपासून होत असलेली नापिकी यामुळे तो आणि कुटुंबीय कर्जाच्या खाईत लोटलेले होते.

पंढरी यांच्या पाठी मागे, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा अप्तपरिवार आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामदार आनंद अचलवार करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here