सुनीलजी देशपांडे – (अ.भा.सहसंपार्क प्रमुख रा.स्व .संघ)
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
शिबाला – मारेगाव, झरी आणि केळापूर तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये गेल्या १२ वर्षांपासून सतत कार्यरत असलेल्या किसान बहुउद्देशीय संस्थेच्या पाठीशी समाजाने उभे राहावे असे आव्हान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख सुनीलजी देशपांडे यांनी केले.
किसान बहुउद्देशीय संस्थेच्या नवीन कार्यालाच्या आणि प्रशिक्षण केंद्र उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुनाजी कुडमेथे हे या संस्थेचे अध्यक्ष असून गेल्या १२ वर्षांपासून सतत अति दुर्गम भागातील आदिवासी बांधवांमध्ये राहून त्यांच्या अनेक समस्यांना समजून आधार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
मग अतिशय गंभीर समस्या असलेली दामिनीची ( कुमारी मातां ) समस्या असो किव्हा तालुक्यातील आत्महत्या केलेल्या महिलांच्या परिवाराला आधार देण्याची समस्या असो,पुनाजी कुडमेथे हा त्यांचा भाऊ म्हणून, त्यांचा पाठीराखा म्हणून सतत त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे.

आपल्या संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या अनेक उपक्रमातून त्यांना आधार देण्याचा तो नेहमीच प्रयत्न करीत असतो. असे असताना समाजाने त्याच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहिले पाहिजे,समाजाच्या सर्वांगीण उन्तीचा विकास करायचा असेल तर समाजाच्या अंतिम घटकांपर्यंत आपण पोहचलो पाहिजे,त्यांना सुशिक्षित आणि सदन समाजाच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सुनीलजी देशपांडे यांनी आपल्या उद्बोधानात म्हटले.
वणी विधानसभा क्षेत्रातले आमदार यांनी नवीन तंत्रज्ञानाचा प्रशिक्षण या ठिकाणी व्हायला पाहिजे त्याकरिता या संस्थेला मदत करीन असे सांगितले याच ठिकाणी उपस्थित असलेले केळापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप भाऊ धुर्वे यांनी या प्रशिक्षण केंद्राला तीन शिलाई मशीन दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन चिकराम यांनी केले प्रमुख पाहुणे श्री सुनील जी यांचे स्वागत संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष यांनी केले.
तसेच आमदार संदीप भाऊ दुर्वे यांचे स्वागत वृंदाताई सोयम यांनी केल्या शिबला येतील सरपंच रजनीताई तोडासे यांचे स्वागत किसान संस्थेचे सचिव वंदना कुडमेते यांनी केले.या कार्यक्रमाला वैयक्तिक गीत मारुती मेश्राम तर आभार प्रदर्शन शारदा कनाके यांनी केले.
या प्रसंग्गी 65 शेतकरी आत्महत्या ग्रस्त दामिनी महिलांचा भाऊबीज कार्यक्रमही घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वणी विधान सभेचे आमदार संजीवरेडी बोदकुलवार, केळापूर विधान सभेचे आमदार संदीप धुर्वे, शिबला येथील सरपंच रजनीताई तोडासे दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे सचिव विजयराव कद्रे,संघाचे प्रांत सेवा प्रमुख सुनीलजी मेहर शिबाला येथील जवळपास चारसेहून अधिक ग्रामवासी उपस्थित होते.


